शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

पेरणीपूर्व शेतकामांना लॉकडाउनचा अडसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 00:28 IST

दाभाडी : महाराष्ट्रात साधारणत: दरवर्षी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनचे आगमन होेते. त्यामुळे मे महिन्यात बळीराजाकडून शेतकामांना व पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना पूर्णविराम दिला जातो; मात्र यंदा संपूर्ण महाराष्ट्रावर कोरोनाचे संकट आल्याने गेल्या दोन महिन्यांहून अधिक काळापासून लॉकडाउन सुरू आहे. हा लॉकडाउन पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना मोठा अडसर ठरत आहे.

दाभाडी : महाराष्ट्रात साधारणत: दरवर्षी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनचे आगमन होेते. त्यामुळे मे महिन्यात बळीराजाकडून शेतकामांना व पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना पूर्णविराम दिला जातो; मात्र यंदा संपूर्ण महाराष्ट्रावर कोरोनाचे संकट आल्याने गेल्या दोन महिन्यांहून अधिक काळापासून लॉकडाउन सुरू आहे. हा लॉकडाउन पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना मोठा अडसर ठरत आहे.जमिनीची नांगरणी करणे, मशागत करणे, गवत काढणे, बांध घालणे अशा अनेक कामांची पूर्वतयारी करूनच पेरणी करावी लागते. ही कामे पूर्ण असल्यास पाऊस पडल्यानंतर शेतकऱ्यांना पेरणी करणे सोपे जाते, मात्र यंदा कोरोनाच्या संकटामुळे शेतकऱ्यांना मजूर मिळणे अवघड झाले आहे. त्यामुळे शेतकºयांना कुटुंबीयांसोबतच कामे करावे लागत आहे. मात्र हे काम मजुरांशिवाय शक्य नसल्याने मोठ्या प्रमाणावर कामे अपूर्ण राहिली आहेतट्रॅक्टर व यंत्रांच्या साहाय्याने नांगरणी व मशागत होत असली तरी या यंत्रसामग्रीला लागणारे साहित्य बाजारात उपलब्ध होत नसल्याने आणि लॉकडाउनमुळे सर्वत्र दुकाने बंद असल्याने यंत्रही बंद अवस्थेत आहेत. त्यातच पिकाला बाजारभाव नसल्याने दोन महिन्यांपासून बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना लागणारा खर्च कसा करावा, या प्रश्नाने शेतकरी चिंतित आहे.-------कोरोनामुळे डाळिंंब, द्राक्ष यांसारख्या फळबागांना मोठा फटका बसला आहे. भाजीपाला तर अक्षरश: सडून खराब झाला आहे. मका, कापूस यांसारख्या पिकांना बाजारात मागणी नाही व योग्य दर मिळत नसल्याने तो तसाच पडून आहे. दरम्यान बाजार समित्या बंद होत्या. आजही किरकोळ बाजारही बंद आहेत. अशा प्रकारच्या अनेक संकटांनी वेढलेल्या बळीराजाला खरीप पिकाच्या पेरणीसाठी शासनाकडून योग्य मदत व्हावी, अशी मागणी कसमादे परिसरातील शेतकºयांनी केली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक