शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

पोषण आहार चवीची ‘खिचडी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 01:03 IST

शालेय पोषण आहार बनविणे, वितरित करणे आणि तपासणीबाबत शालेय शिक्षण विभागाकडून आजवर अनेक निर्णय घेण्यात आले आणि काही बदलण्यातही आले. पोषण आहारातील हा प्रयोग अजूनही सुरूच असून, आता पोषण आहाराची चव तपासण्याच्या जबाबदारीतून मुख्याध्यापकांना वगळण्यात आले आहे.

नाशिक : शालेय पोषण आहार बनविणे, वितरित करणे आणि तपासणीबाबत शालेय शिक्षण विभागाकडून आजवर अनेक निर्णय घेण्यात आले आणि काही बदलण्यातही आले. पोषण आहारातील हा प्रयोग अजूनही सुरूच असून, आता पोषण आहाराची चव तपासण्याच्या जबाबदारीतून मुख्याध्यापकांना वगळण्यात आले आहे. शासनाच्या या निर्णयामुळे आहारावरील नियंत्रण कमी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे चव तपासण्यासाठीची यंत्रणा अस्तित्वात असली तरी या यंत्रणेकडून खरोखरच आहाराची तपासणी होते का? हाही मोठा प्रश्नच आहे.  शालेय विद्यार्थ्यांना सकस पोषण आहार मिळावा यासाठी शासनाने नियमावली तयार केलेली आहे. या नियमावलीनुसार शालेय विद्यार्थ्यांना सकस आहार दिला जातो की नाही हे तपासण्याची जबाबदारी शाळापातळीवर निश्चित असताना यातून आता मुख्याध्यापकांना वगळण्यात आल्याने पोषण आहाराचा दर्जा तपासण्याबाबत काहीशी शिथिलता निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुख्याध्यापकांवरील कामाचा ताण पाहता त्यांना या जबाबदारीतून मुक्त करून त्यांच्यावरील भार हलका करण्यात आलेला आहे.शालेय पोषण आहार योजना राबविताना मुलांना देण्यात येणाऱ्या पोषण आहाराची चव मुख्याध्यापकांनादेखील घ्यावी लागत होती. आहाराची प्रथमस्तरावर चव आहार तयार करणारा स्वयंपाकी, दुसºया स्तरावर शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, तर शेवटी तिसºया स्तरावर मुख्याध्यापक यांच्यावर चव घेण्याची जबाबदारी होती. परंतु मुख्याध्यापकांवरील अन्य कामाचा ताण पाहता खिचडीची चव घेण्याच्या जबाबदारीतून मुख्याध्यापकांना वगळण्यात यावे, अशी मागणी सातत्याने केली जात होती. अनेक वर्षांपासून याबाबत शासनदरबारी मुख्याध्यापकांचा प्रयत्न सुरू होता.  आता काही अटींमध्ये शासनाने शिथिलता आणली असून मुख्याध्यापकांना दिलासा देण्यात आला आहे. चव चाखण्यासाठी तीन स्तरावर होणारी सक्ती आता कमी करण्यात आलेली आहे. आहाराची चव आता शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, शाळांचे मुख्याध्यापक किंवा योजनेशी शिक्षक यापैकी केवळ एकानेच चव घ्यावी, असे आदेश शासनाकडून प्राप्त झाले आहेत. शासनाच्या या निर्णयामुळे मुख्याध्यापकांवरील सक्ती कमी झाली आहे.तपासणी शाळास्तरावरच अवलंबूनअस्तित्वात असलेली यंत्रणा आणि नवी यंत्रणा खरोखरच पोषण आहाराची चव घेते का? हा संशोधनाचा विषय आहे. पोषण आहाराची चव खरोखरच तपासली जाते की नाही याची तपासणी न होता केवळ ‘चव नोंद’ वहीच तपासली जाते, असे आजवरचे चित्र राहिले आहे.

टॅग्स :Schoolशाळाfoodअन्नStudentविद्यार्थीNashikनाशिक