शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

जिल्ह्याचा कोरोनाबाधितांचा आकडा आता ७०१; काठेगल्लीत नवीन रूग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 20:37 IST

नाशिक जिल्हा प्रशासनाने बुधवारपासून शहरातील जवळपास सर्वच दुकाने खुली करण्याची मुभा दिली आहे. अर्थचक्र गतिमान करण्यासाठी प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला असला तरीदेखील त्याचा गैरफायदाच अधिक

ठळक मुद्देकाठेगल्लीत नवीन रूग्णजिल्ह्यात सर्वाधिक ५५३ रुग्ण हे मालेगाव महापालिका क्षेत्रातील

नाशिक : जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून मंगळवारी (दि.१२) जिल्ह्यात रात्री साडे आठ वाजेपर्यंत कोरोनाग्रस्तांचा आकडा ७०१ वर पोहचला. मंगळवारी संध्याकाळी प्राप्त झालेल्या अहवालात धक्कादायक बाब म्हणजेत नाशिक शहरातील काठेगल्ली भागातील बनकर चौकात असलेल्या एका सोसायटीमधील ३१ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे.

ही व्यक्ती शहराच्या एका महापालिकेच्या दवाखान्यात सेवक म्हणून कर्तव्यावर असताना त्यास कोरोनाची बाधा झाल्याचे बोलले जात आहे. कुठलेही लक्षणे त्या व्यक्तीला आढळून न येता केवळ दैनंदिन तपासणीदरम्यान, त्या व्यक्तीचा कोरोना चाचणी नमुना अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. यामुळे महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी तत्काळ बनकर चौक, अक्षर इस्टेट-अ, राम संकुल हा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला आहे.जिल्ह्यात सर्वाधिक ५५३ रुग्ण हे मालेगाव महापालिका क्षेत्रातील आहे. नाशिक शहरात कोरोना आजरग्रस्त रूग्णांची संख्या आता ४०वर पोहचली आहे. नाशिक ग्रामिणमधील कोरोनाग्रस्तांचा आकडादेखील दुसरीकडे वाढत असून आता मंगळवारी ८६वर पोहचला आहे.नाशिक ग्रामिणमधील नाशिक तालुक्यात ८ येवल्यामध्ये ३१ तर चांदवड-४ सिन्नर-६, निफाड-१२, दिंडोरी-६ नांदगाव-३, सटाणा-२ आणि मालेगाव ग्रामिण-१४ अशी जिल्ह्यातील रुग्णसंख्या आहे. जिल्ह्यात बळींची संख्या ३३ इतकी आहे. यामध्ये ३१ कोरोनाग्रस्त रुग्ण मालेगावमध्ये दगावले आहेत.नाशिकमध्ये अद्याप सातपूर परिसरात १६, सिडको भागात ८, पंचवटी परिसरात ५, नाशिक पुर्व भागातील विविध उपनगरांत ५, नाशिकरोड भागात ३, नाशिक पश्चिममध्ये १ आणि स्थलांतरीत मनपा हद्दीबाहेरील २ अशा ४० रुग्णांचा समावेश आहे. नाशिक शहरात एका पोलिसासह गर्भवती महिलेचा कोरोनामुळे मृत्यूदेखील झाला आहे.एकूणच जिल्ह्यातील मालेगावमध्ये कोरोनाचा कहर सुरू असून नाशिक शहरातही विविध उपनगरांमध्ये आता कोरोनाचा प्रादूर्भाव वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांनी लॉकडाउनचे सर्व नियमांचे पालन करणे अत्यावश्यक असून गरजेपुरतेच बाहेर पडावे, तेदेखील योग्य ती काळजी घेऊनच असे आवाहन जिल्हा व आरोग्य प्रशासनाबरोबरच पोलीस प्रशासनाकडूनही केले जात आहे; मात्र नागरिकांमध्ये त्याचे कुठलेही गांभीर्य दिसून येत नसल्याने मोठे आश्चर्य व्यक्त होत आहे.नाशिक जिल्हा प्रशासनाने बुधवारपासून शहरातील जवळपास सर्वच दुकाने खुली करण्याची मुभा दिली आहे. अर्थचक्र गतिमान करण्यासाठी प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला असला तरीदेखील त्याचा गैरफायदाच अधिक घेतला जात असल्याचे दिसून येत आहेत.-----शहरातील २८ उपनगरे प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून ‘सील’ (कंसात सीलची मुदत)सिडको - (१८ मे पर्यंत)नवश्या गणपती मंदीर परिसर (२२ मे)धोंगडे मळा, ना.रोड (२२ मे)समाजकल्याण कार्यालय, पौर्णिमा बस स्टॉप (२७ मे)संजीवनगर नाशिक (३० मे)चित्रलेखा सोसा. आरटीओ कॉर्नर (६ जून),सावतानगर सिडको (१३ जून)उत्तमनगर सिडको (१३ जून)मालपाणी सॅफ्रॉन, पाथर्डी फाटा (१३ जून)सातपूर कॉलनी ( १३ जून)वृंदावन कॉलनी, जनरल वैद्यनगर (१४ जून)बजरंगवाडी झोपडपट्टी (१६ जून)शांतिनिकेतन चौक ( १७ जून )माणेक्षानगर (१७ जून)पाटीलनगर, सिडको ( १९जून)हनुमान चौक, सिडको (१९ जून)जाधव संकुल, नाशिक ( १९ जून )हिरावाडी, पंचवटी ( १९जून)श्रीकृष्णनगर (१९ जून)इंदिरानगर (२०जून)तारवालानगर (२०जून)अयोध्यानगरी, हिरावाडी (२०जून)तक्षशिला रो-हाऊस परिसर, कोणार्कनगर-२ (२०जून)सागर व्हिलेज, धात्रकफाटा परिसर (२० जून)हरी दर्शन सोसा. धात्रकफाटा (२० जून)सिन्नरफाटा, नाशिकरोड (२१ जून)काठेगल्ली बनकर चौक श्री हरी अपार्टमेंट परिसर (२१ जून) 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसnashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका