वॉटरकप स्पर्धेत सिन्नरमधील दोन गावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 22:34 IST2018-04-25T22:34:11+5:302018-04-25T22:34:11+5:30
दुष्काळी गावे पाणीदार बनविण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या वॉटरकप स्पर्धेत सिन्नर तालुक्यातील वडझिरे आणि धोंडबार या दोन गावांत गुरुवारपासून श्रमदान करण्यासाठी अवघे गाव एकत्र येणार आहे. पाण्यासाठी वणवण करावी लागणाऱ्या या गावांतील रहिवाशांनी दुष्काळाशी दोन हात करण्याचा संकल्प केला असून, गावातील नागरिक सर्व व्यवहार बंद करून श्रमदान करणार आहेत. सकाळी ७ वाजेपासून या श्रमदानाला प्रारंभ होणार आहे.

वॉटरकप स्पर्धेत सिन्नरमधील दोन गावे
नाशिक : दुष्काळी गावे पाणीदार बनविण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या वॉटरकप स्पर्धेत सिन्नर तालुक्यातील वडझिरे आणि धोंडबार या दोन गावांत गुरुवारपासून श्रमदान करण्यासाठी अवघे गाव एकत्र येणार आहे. पाण्यासाठी वणवण करावी लागणाऱ्या या गावांतील रहिवाशांनी दुष्काळाशी दोन हात करण्याचा संकल्प केला असून, गावातील नागरिक सर्व व्यवहार बंद करून श्रमदान करणार आहेत. सकाळी ७ वाजेपासून या श्रमदानाला प्रारंभ होणार आहे.
अभिनेते आमीर खान यांच्या बहुचर्चित वॉटरकप स्पर्धेमध्ये राज्यातील तीनशेपेक्षा अधिक गावांनी सहभाग घेतला आहे. वर्षानुवर्षे गावातील पाण्याचे स्रोत बंद झाल्याने तसेच पाणी वाहून जात असल्याने राज्यातील असंख्य गावे दुष्काळग्रस्त आहेत. या गावांना पाणीदार गाव बनविण्यासाठी गावामध्येच श्रमदानाची भावना निर्माण करून नागरिकांना पाणीदार गावासाठी प्रवृत्त करण्याची आमीर खान यांच्या पाणी फाउंडेशनची योजना आहे. अगोदर गावाने पाण्यासाठी उभे राहावे आणि नागरिकांना पाण्याचे महत्त्व पटावे यासाठी गावकºयांना या मोहिमेत सहभागी करून घेतले जात आहे.
या मोहिमेत सिन्नर तालुक्यातील वडझिरे, धोंडबार या गावांमधील नागरिक श्रमदान करणार असून, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य, शासकीय अधिकारी, शिक्षक, विद्यार्थी सहभागी होणार आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते हेदेखील या मोहिमेत सहभागी होऊन ग्रामस्थांना पाणी मोहिमेबाबत मार्गदर्शन करणार आहेत. ग्रामस्थांच्या श्रममोहिमेतून दुष्काळाचा शाप पुसण्यासाठी, नवा इतिहास घडविण्यासाठी अवघ्या गावातून श्रमदानाचे तुफान आले पाहिजे, या भूमिकेतून गिते हे ग्रामस्थांचे मनोबल उंचावणार आहेत.