शेतकरी आठवडे बाजार अखेर बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2019 04:58 PM2019-01-08T16:58:41+5:302019-01-08T16:58:41+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : शेताच्या बांधावरून शेतकऱ्यांमार्फत विना मध्यस्थ थेट नागरिकांच्या पिशवीपर्यंत शेतमाल उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने राज्य ...

nshik,farmerf,closes,market,for,weeks | शेतकरी आठवडे बाजार अखेर बंद

शेतकरी आठवडे बाजार अखेर बंद

Next
ठळक मुद्दे कृषी पणन मंडळ व नाशिक पंचवटी पांजरापोळ

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : शेताच्या बांधावरून शेतकऱ्यांमार्फत विना मध्यस्थ थेट नागरिकांच्या पिशवीपर्यंत शेतमाल उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने राज्य कृषी पणन मंडळ व नाशिक पंचवटी पांजरापोळ यांच्यावतीने शहरात सुरू करण्यात आलेला शेतकरी आठवडे बाजार अखेर बंद झाला आहे. प्रारंभीपासून स्थानिक भरेकºयांकडून होणारा विरोध तसेच जवळच भरविण्यात आलेला बाजार यामुळे अखेर या बाजाराला घरघर लागली आणि सदर बाजार बंद पडला.
शासनाच्या संत सावता माळी शेतकरी आठवडे बाजार अभियानांतर्गत शहरातील मखमलाबाद-हनुमानवाडी रस्त्यावरील पांजरापोळच्या जागेत दर शुक्रवारी ‘शेतकरी आठवडे बाजार’ भरत होता. पांजरापोळ संस्थची जागा नोंदणीकृत शेतकºयांसाठी मोफत उपलब्ध करून देण्यात आली होती. शेतकरी या ठिकाणी आपला शेतमाला आणून वाजवी दरात विक्री करीत होते. परंतु त्यास सुरूवातीपासून भरेकºयांचा विरोध होता. बाजारात त्यांनी धुडगूसही घातला होता.

‘आठवडे बाजाराची’ कल्पना
 ग्राहकांना ताजा आणि वाजवी दरात भाजीपाला मिळावा याबरोबरच शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ मिळावी यासाठी ‘आठवडे बाजाराची’ कल्पना होती. बाजारात थेट शेतीच्या बांधावरून शेतमाल कुठल्याही मध्यस्थ, व्यापारी अथवा किरकोळ विक्रेत्यांमार्फत बाजारात आणला जात होता. शेतकरी स्वत: बाजारात शेतमालाच्या विक्रीसाठी बसत होते. कृषी पणन मंडळाने यासाठी त्यांना स्टॉल्स देऊ केले होते. तसेच नोंदणीकृत शेतकºयांना ओळखपत्रही दिले होते. कृषी पणन मंडळाने पुढाकार घेऊन शेतकºयांसाठी ‘शेतकरी आठवडे बाजार’ सुरू केला होता. सुरूवातील या बाजाराला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. बाजारात गर्दी होऊ लागल्याने स्थानिक भरेकºयानी आठवडे बाजार उलथून टाकण्याचा प्रयत्न केल्यानंतर बाजार नेहमीच दहशतीच्या सावटात होता.

Web Title: nshik,farmerf,closes,market,for,weeks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.