शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
2
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
3
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
4
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
5
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
6
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
7
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
8
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
9
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
10
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
11
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
12
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
13
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
14
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
15
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
16
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
17
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
18
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
19
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
20
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
Daily Top 2Weekly Top 5

कारागृहात आता मोबाइल जामर

By admin | Updated: March 3, 2017 01:33 IST

नाशिकरोड : नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात कैद्याकडून मोबाइलचा वापर केला जात असल्याने त्याला पायबंद घालण्यासाठी कारागृह प्रशासनाकडून कारागृहात २५ ठिकाणी जामर बसविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

 नाशिकरोड : नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात कैद्याकडून मोबाइलचा वापर केला जात असल्याने त्याला पायबंद घालण्यासाठी कारागृह प्रशासनाकडून कारागृहात २५ ठिकाणी जामर बसविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यामुळे काही प्रमाणात नक्कीच मोबाइल वापरावर परिणाम होणार आहे.नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात कैदी मोबाइलचा वापर करत असल्याचे विविध ठिकाणच्या पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. गेल्या डिसेंबर महिन्यात तर दिवसाआड कारागृहात मोबाइल बेवारस सापडण्याचा प्रकार उघडकीस आला होता. तेव्हा ५० हून अधिक मोबाइल सापडले होते. कारागृहात कैद्याकडे मोबाइल कसा पोहचतो याचे गूढ मात्र अद्यापही गुलदस्त्यात आहे. मात्र कारागृहाच्या बाहेरील बाजूने अज्ञात युवक कारागृहाच्या उंच तटरक्षक भिंतीवरून अत्यंत व्यवस्थित पॅकिंग केलेला मोबाइल आतमध्ये फेकत असल्याचे बोलले जाते. मात्र आतमध्ये ज्या कैद्याकरिता मोबाइल फेकला आहे तो मोबाइल त्याच कैद्याला कसा मिळतो हेदेखील गूढ आहे. कारागृहात मोबाइल कैद्यापर्र्यंत पोहचले, मोबाइल वापरासाठी चार्जिंग करणे आदि सर्व प्रकार संशयास्पद आहे.कारागृहात कैद्यांना मोबाइलचा वापर करण्यापासून रोखण्यासाठी कारागृह प्रशासनाने महत्त्वाच्या २५ ठिकाणी जामर बसविण्यास गेल्या दोन दिवसांपासून सुरुवात केली आहे. कैद्याचे बॅरेक, त्यांना ज्या भागात दिवसभर सोडले जाते अशा महत्त्वाच्या २५ ठिकाणी प्राधान्याने जामर बसविण्यात येत असल्याचे कारागृह अधीक्षक रमेश कांबळे यांनी सांगितले. यामुळे नक्कीच कारागृहात काही प्रमाणात कैद्यांना मोबाइलचा वापर करणे अवघड होऊन जाणार आहे. कारागृहात बसविण्यात येत असलेल्या ‘जामर’चा कितपत फायदा झाला हे आगामी काळात समजेलच. (प्रतिनिधी)