शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

आता पूर्णत्वाच्या दाखल्याचा प्रवास होणार आॅनलाइन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 00:37 IST

महानगरपालिकेच्या नगररचना विभागाने पूर्णत्वाचा दाखला दिल्यानंतर तो घरपट्टी विभागाकडे पाठविण्यास होणारा विलंब लक्षात घेता आता नगररचनातून या दाखल्याचा प्रवास आॅनलाइन होणार असून, त्यामुळे योग्यवेळी करआकारणीदेखील करता येणार आहे. त्यामुळे घरपट्टी लागू करण्यासाठी महापालिकेचा मिळकत कराकडे तगादा लावण्याची आता गरज पडणार नाही.

नाशिक : महानगरपालिकेच्या नगररचना विभागाने पूर्णत्वाचा दाखला दिल्यानंतर तो घरपट्टी विभागाकडे पाठविण्यास होणारा विलंब लक्षात घेता आता नगररचनातून या दाखल्याचा प्रवास आॅनलाइन होणार असून, त्यामुळे योग्यवेळी करआकारणीदेखील करता येणार आहे. त्यामुळे घरपट्टी लागू करण्यासाठी महापालिकेचा मिळकत कराकडे तगादा लावण्याची आता गरज पडणार नाही.शहरात कोणीही बांधकाम केल्यास महापालिकेच्या नगररचना विभागाच्या वतीने परवानगी घ्यावी लागते. बांधकामाची परवानगी घेतल्यानंतर पूर्णत्वाचा दाखला दिला जातो. हा मिळकतदाराला देतानाच त्याची एक प्रत विभागीय कार्यालयांकडील मिळकत करविभागाकडे पाठवली जाते. यामध्ये हस्तलिखित नोंदी घेऊन दाखले वितरित करण्यामध्ये विलंब होतो. तसेच सदरचे दाखले संगणकीय कार्यप्रणालीवर नोंद नसल्याने, त्यांचा हिशोब ठेवणे, कर निरीक्षकाकडे दाखले प्राप्त असूनदेखील प्राप्त दाखले करआकारणी होत नसल्याचे प्रशासनाला आढळले आहे.मिळकतधारकांना वेळेत कर निर्धारण केल्यास कराचा भरणादेखील वेळेत करणे मिळकतधारकांना शक्य होते, याचा विचार करून नगरनियोजन विभागाकडून वितरित होणारे दाखले, मिळकतधारकास वितरत करण्यापूर्वीच त्यांची नोंद मालमत्ता कराच्या कार्यप्रणालीवर घेण्यात येणार आहे.  त्यामुळे महापालिकेच्या कामकाजात सुलभता येईलच, परंतु दाखले घेऊन पुन्हा मिळकत कर विभागाकडे घरपट्टी लागू करण्याची गरज पडणार नाही.सुलभता येणारनगररचनाकडून वितरीत होणारे दाखले महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर पाहण्यासाठी उपलब्ध असतील. त्यामुळे नागरिकांना त्याची माहिती मिळेलच, परंतु विभागप्रमुखांना कर निर्धारणाबाबतचे आढावा घेणे, जबाबदारी निश्चित करणे, वेळेत कर निर्धारण करून घेणे सुलभ होणार आहे.

टॅग्स :onlineऑनलाइनNashikनाशिक