महापालिकेचा आता ‘संगणकीय खर्डा

By Admin | Updated: May 23, 2014 00:29 IST2014-05-23T00:27:13+5:302014-05-23T00:29:41+5:30

संगणकीय खर्डा पालिकेत उपलब्ध होणार आहे.

Now the 'computing cord' of the municipal corporation | महापालिकेचा आता ‘संगणकीय खर्डा

महापालिकेचा आता ‘संगणकीय खर्डा

’नाशिक : पालिकेच्या विविध खात्यांशी निगडित न्यायालयात दाखल प्रकरणे किती, कोणत्या दाव्याची पुढील सुन्यायालयातील खर्ड्याच्या धर्तीवर संगणकीय खर्डा पालिकेत उपलब्ध होणार आहे. महापालिकेचे विविध निर्णय आणि कृतीला आव्हानावणी कधी आहे याची माहिती आता संपूर्णत: संगणकीकृत करण्यात येत असून, त्यामुळे न देणारे दावे आणि याचिका न्यायालयात दाखल होत असताना जिल्हा न्यायालय, उच्च न्यायालय आणि सर्वाेच्च न्यायालयाबरोबरच हरित न्यायाधिकरणातदेखील विविध दावे दाखल होतात. त्यासाठी पालिकेकडे स्वतंत्र विधी विभाग आहे. परंतु खटले दाखल होताना नगररचना, घरपट्टी, पाणीपट्टी, उद्यान विभाग अशा विविध विभागांशी संबंधित असतात. त्यामुळे विधी विभागाला विविध विभागांशी समन्वय साधावा लागतो आणि त्यांच्याकडून न्यायालयाच्या आदेशांचे पालन करून घ्यावे लागते. पालिकेत सद्यस्थितीत पाचशेहून अधिक खटले विविध न्यायालयांत सुरू आहेत, तर महिन्याकाठी दहा ते पंधरा दावे पालिकेच्या विरोधात दाखल होतात आणि प्रत्येक ठिकाणी आयुक्त आणि खातेप्रमुख प्रतिवादी असतात. त्या सर्व ठिकाणी पालिकेला वकील नियुक्त करावा लागतो; अशी अनेक कामे असून त्यात सुसूत्रता आणण्यासाठी ‘लॉ मॅनेजमेंट’ नावाचे सॉफ्टवेअर विकसित केले जात आहे. महिनाभरात ते कार्यान्वित होणार आहे. या सॉफ्टवेअरच्या आधारे सर्व दावे आणि याचिकांची सविस्तर माहिती उपलब्ध असेल. परंतु त्याचबरोबर विविध खात्यांनादेखील त्याची माहिती अवगत करून देण्यासाठी युजर आयडी आणि पासवर्ड दिला जाईल. त्यामुळे संबंधित खात्यांना आपल्या दाव्यांची पुढील सुनावणीची न्यायालयाने दिलेल्या निर्देशांची माहिती मिळेल. इतकेच नव्हे तर संबंधित खटल्याचा निकाल लागल्यानंतर न्यायालयाच्या संकेतस्थळावरून तो डाऊनलोड करून घेऊन संबंधित खात्यासदेखील उपलब्ध केला जाईल. त्यामुळे विधी विभागाचे काम अधिक सुलभ होणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Now the 'computing cord' of the municipal corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.