शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
2
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
3
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
4
Top Marathi News Live: आयपीएल २०२६ प्लेऑफची शर्यत रंगात; केकेआरच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल
5
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
6
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
7
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
8
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
9
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
10
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
11
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
12
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
13
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
14
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
15
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
16
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
17
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
18
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
19
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
20
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचाऱ्यांना बोनस नव्हे अ‍ॅडव्हान्स

By admin | Updated: October 24, 2016 00:10 IST

आरोग्य विद्यापीठ : शासनदरबारी पुन्हा अपयशी

नाशिक : कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याबाबत व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत सकारात्मक चर्चा होण्याचे गाजर दाखविण्यात आल्यामुळे कर्मचाऱ्यांना सानुग्रहाची अपेक्षा असतानाच विद्यापीठ व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांना ‘अ‍ॅडव्हान्स’ देऊ केल्याने सानुग्रहाच्या विषयाला पूर्णविराम मिळाला आहे. विशेष म्हणजे विद्यापीठ निधीतील कर्मचाऱ्यांची मुदत एप्रिल २०१७ मध्ये संपत असल्याने त्यांना अ‍ॅडव्हान्स देताना शासन सेवेतील नियमित अधिकाऱ्यांना संबंधित कर्मचाऱ्यांची हमी द्यावी लागणार आहे. आरोग्य विज्ञान विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना २०१४ मध्ये सानुग्रह अनुदान देण्यात आले होते. त्यानंतर मात्र शासनाने हस्तक्षेप करीत सानुग्रह देण्यास हरकत घेतली होती. कर्मचाऱ्यांना यंदा सानुग्रह देण्यासाबाबत विद्यापीठ सकारात्मक असल्याचे कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी कर्मचाऱ्यांशी चर्चा करताना सांगितले होते. कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी याप्रकरणी लक्ष घातल्याचे सांगून कर्मचाऱ्यांना यंदा दिवाळी गोड जाईल, असे आश्वासन दिले होते. परंतु आता विद्यापीठाने कर्मचाऱ्यांना दहा हजार रुपये अ‍ॅडव्हान्स घेऊन जाण्याचे पत्र काढल्यामुळे शासनदरबारी सानुग्रह विषय मान्य करण्यात आला नसल्याचे यावरून दिसून येते. विद्यापीठाचे कामकाज कमी मनुष्यबळावर चालते. त्यामुळे एका कर्मचाऱ्यावर इतर अनेक जबाबदाऱ्या असतात, त्यांना अतिरिक्त कामकाज करावे लागते. विशेष म्हणजे ही सर्व कामे विहित वेळेत पूर्ण करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते. त्यामुळे त्यांना सानुग्रह सुरू करावे, अशी कर्मचाऱ्यांची मागणी होती. विद्यापीठ निधीतून सानुग्रह देण्यात यावे, शासनाचा कोणत्याही हस्तक्षेप असण्याचे कारणच नाही, असा युक्तिवादही कर्मचाऱ्यांनी केला होता. मात्र कर्मचाऱ्यांना यंदाही सानुग्रह मिळणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानेच त्यावर उतारा म्हणून अ‍ॅडव्हान्स देण्याची तयारी विद्यापीठाने केली आहे. याबाबतचे परिपत्रकही विद्यापीठात वाचून दाखविण्यात आले. (प्रतिनिधी)