शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांकडून असहकार

By admin | Updated: June 24, 2014 00:38 IST

गेल्या काही महिन्यांपासून पोलिसांचे सहकार्य मिळत भगूर : नसल्याने आता भगूरमधील ज्येष्ठ नागरिक, विविध सामाजिक संघटनांनी पोलिसांना विनंती करण्याची भूमिका घेतली आहे.

भगूर : येथील गावठाण जागा क्र. ९४५ अ-क वरील अनधिकृत झोपडपट्टी हटविण्यासाठी भगूर नगरपालिकेकडून प्रयत्न सुरू आहेत; मात्र पोलीस बंदोबस्त मिळत नसल्याने अतिक्रमण कायम आहे. गेल्या काही महिन्यांपासून पोलिसांचे सहकार्य मिळत नसल्याने आता भगूरमधील ज्येष्ठ नागरिक, विविध सामाजिक संघटनांनी पोलिसांना विनंती करण्याची भूमिका घेतली आहे. जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय पुनरुत्थान योजनेअंतर्गत भगूर पालिकेला घरकुल योजनेसाठी कोट्यवधी रुपये मंजूर केले आहेत. त्यामुळे पालिकेच्या जागेवर असलेल्या अनधिकृत झोपडपट्टीधारकांना हटवून तेथे घरकुल योजना बांधण्याची योजना आहे. परंतु येथील झोपडपट्टीधारक हटण्यास तयार नसल्याने घरकुल योजनाही अडचणीत आली आहे. येथील नागरिकांनी बेघर होण्याच्या भीतीने या योजनेलाच विरोध केला असून, येथील नागरिकांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप पालिकेने केला आहे. घरकुल योजना राबविण्यासाठी पालिकेने जिल्हाधिकाऱ्यांशी भेट घेऊन अतिक्रमण हटविण्याची मागणी केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार पालिका प्रशासनाने पोलीस आयुक्तांना अतिक्रमण हटविण्याबाबत पत्र दिले आहे. त्यानुसार उपआयुक्त डॉ. डी. एस. स्वामी यांनी झोपडपट्टीधारकांची बैठकही घेतली होती; मात्र अजूनही तोडगा निघू शकलेला नाही. महानगरपालिकेने २४ जानेवारी २०१४ आणि २५ मार्च २०१४ रोजी झोपडपट्टीतील घरे काढण्यासाठी पोलीस आयुक्तांना पत्र दिले. अनेक वेळा पोलिसांकडून मदत मागितली असतानाही पोलीस आयुक्तांकडून सहकार्य मिळत नसल्याची पालिकेची तक्रार आहे. या प्रकरणी नागरिक लवकरच गृहमंत्री, उपमुख्यमंत्री यांना भेटणार असून, नाशिक पोलिसांबद्दल तक्रार करणार असल्याचे समजते. तसेच आता पावसाळा सुरू झाला ही सबब सांगून पोलीस बंदोबस्त देण्यात असमर्थता दाखवित आहेत. (वार्ताहर)