शहरं
Join us  
Trending Stories
1
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
2
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
3
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
4
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
5
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
6
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
7
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
8
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
9
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
12
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
13
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
14
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
15
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
16
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
17
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
18
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
19
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
20
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!

‘नो सेल्फी झोन’च बनत आहेत सेल्फी झोन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2019 12:20 AM

पावसाळा सुरू झाला की पर्यटनस्थळांना एक वेगळीच झळाळी येते त्यामुळे पावसाळ्यात पर्यटनाला अधिक महत्त्व प्राप्त होते. त्यामुळे पावसाळ्यात धरणे, तलाव, धबधबे, डोंगर व टेकडीच्या परिसरांना पर्यटनाला अधिक महत्त्व दिले जाते. तसेच धार्मिक स्थळांकडेही पर्यटकांचा मोठा कल असतो.

नाशिक : पावसाळा सुरू झाला की पर्यटनस्थळांना एक वेगळीच झळाळी येते त्यामुळे पावसाळ्यात पर्यटनाला अधिक महत्त्व प्राप्त होते. त्यामुळे पावसाळ्यात धरणे, तलाव, धबधबे, डोंगर व टेकडीच्या परिसरांना पर्यटनाला अधिक महत्त्व दिले जाते. तसेच धार्मिक स्थळांकडेही पर्यटकांचा मोठा कल असतो. त्यामुळे पावसाळ्यात अशा ठिकाणी नागरिकांबरोबरच पर्यटकांची गर्दी अधिक होत असते. पण ही स्थळे मुख्यत: धोकादायक असतात त्यात पावसाळ्यात या स्थळांवरील स्थिती अधिक गंभीर बनत असते. त्यामुळे अशा ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजना करणे आवश्यक ठरतात.दरम्यान, दोन दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात होणारा पावसामुळे जिल्ह्यातील पर्यटनस्थळे बहरली आहे. त्यामुळे अशा ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजना कार्यरत असणे गरजेचे आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने मागील महिन्यातच सर्वच शासकीय कार्यालयांना तसे आदेशही दिले गेले असतांनी आपापल्या परिक्षेत्रात सुरक्षेच्या उपाययोजनांची कमतरता जाणवत आहे. गत दोन दिवसांपासून सुरू असेलेल्या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला असून, प्रशासनाकडून नागरिकांना सर्तकतेचे आवाहन करण्यात आले आहे. पण काही अतिउत्साही पर्यटक धोकादायक ठिकाणी जाऊन सेल्फी घेत असल्याचे दिसून येत आहे. सदर स्थळांवर काही प्रमाणात पोलिसांची गस्त असून, सुद्धा धोकादायक ठिकाणी जाऊन सेल्फी काढण्याचे प्रमाण कमी झालेले नाही. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे मुख्य अधिकाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा आधार घेऊन या विभागांच्या जबाबदाºया निश्चित करून दिल्या आहेत, पण पर्यटकांची गर्दी बघता अशा ठिकाणी उपलब्ध मनुष्यबळाला मर्यादा येत आहेत. तसेच काही पर्यटनस्थळांवर ‘नो सेल्फी झोन’चे फलकही दिसून येत नाही. त्यामुळे पर्यटकांनी थेट घसरणीच्या ठिकाणी जाऊन सेल्फी घेण्याची मजल वाढली आहे. यात तरुण-तरुणींची संख्या मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे.‘नो सेल्फी झोन’ची ठिकाणेरामकुंड, तपोवन, सोमेश्वर धबधबा, सोमेश्वर मंदिर, पांडवलेणी, चामरलेणी, नवश्या गणपती, संत गाडगे महाराज पूल, व्हिक्टोरिया पूल, चित्ते पूल, चोपडा लॉन्स पूल, गंगापूर धरण, आशावाडी किल्ला, रामशेज किल्ला, दुगारवाडी धबधबा, पहिने परिसर, ब्रह्मगिरी, अंजनेरी, वाघेरा घाट, हरिहर गड, अशोका धबधबा, कसारा घाट, घाटनदेवी, वैतरणा धरण, भावली धरण, दारणा धरण आदी.सूचनांकडे केले जाते दुर्लक्षसेल्फी झोन, नो सेल्फी झोन, धोकादायक ठिकाणे, अरुंद रस्ता, वाहतुकीस अडचण, कुठल्या बाजूने जावे, कुठून जाऊ नये, अशी माहिती देणारे फलक काही ठिकाणी दिसून येत नाही. त्यामुळे पर्यटकांना धोकादायक स्थळांची माहिती मिळत नाही. त्यामुळे अशा ठिकाणी दुर्घटना होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर असते. त्यात अशा ठिकाणी तळीरामांची संख्याही जास्त प्रमाणात आढळून येते. त्यामुळे असे पर्यटक जिवाची तमा न बाळगता धोकादायक ठिकाणी जाऊन सेल्फी, फोटो काढत असतात.

टॅग्स :Selfieसेल्फीDamधरणriverनदीRainपाऊस