शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
5
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
6
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
7
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
8
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
9
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
10
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
11
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
12
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
13
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
14
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
15
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
16
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
17
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
18
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
19
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
20
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे

उत्पन्न नाही, फी वाढही नको ; सध्याच्या शुल्कातही कपात करा - ग्राहक पंचायत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 17:07 IST

अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. तर काहींच्या पगारात कपात करण्यात आलेली आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांची आर्थिक घडी विस्कळीत झालेली आहे, त्यामुळे अनेकांचे आर्थिक गणित बिघडले आहे. त्यांना उभारण्यासाठी व अशा कुटुंबातील मुलांच्या शिक्षणावर त्याचा परिणाम होऊ नये, यासाठी यंदाच्या वर्षी शाळांनी फी वाढ करू नये, शैक्षणिक सुविधांचा वापर करावा लागला नाही. त्यासाठीचा खर्च कमी होणार असल्याने शाळेची फी ४० ते ५० टक्के कमी करण्यात यावी, अशी मागणी ग्राहक पंचायततर्फे करण्यात आली आहे.

ठळक मुद्देवाढीव शुल्क मागणाऱ्या संस्थांवर कारवाई कराग्राहक पंचात महाराष्ट्रच्या नाशिक विभागाची मागणी

नाशिक : कोरोना व्हायरसचा फटका विविध क्षेत्रांना बसला असून, यामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. तर काहींच्या पगारात कपात करण्यात आलेली आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांची आर्थिक घडी विस्कळीत झालेली आहे, त्यामुळे अनेकांचे आर्थिक गणित बिघडले आहे. त्यांना उभारण्यासाठी व अशा कुटुंबातील मुलांच्या शिक्षणावर त्याचा परिणाम होऊ नये, यासाठी यंदाच्या वर्षी शाळांनी फी वाढ करू नये, शैक्षणिक सुविधांचा वापर करावा लागला नाही. त्यासाठीचा खर्च कमी होणार असल्याने शाळेची फी ४० ते ५० टक्के कमी करण्यात यावी, अशी मागणी ग्राहक पंचायत, महाराष्ट्राच्या नाशिक विभागातर्फे करण्यात आली आहे. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुमारे अडीच ते तीन महिने राज्यातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील व्यवहार, उद्योग ठप्प होते. त्यानंतर जून महिन्यात सर्व जनजीवन सुरळीत होण्यासाठी राज्यसरकार विविध स्तरावरून प्रयत्नशील आहे. अशातच सर्व व्यवहार ठप्प असल्यामुळे सर्वसामान्य जनतेची आर्थिक घडी विस्कळीत झाली आहे. अशा स्थितीत राज्यात लागू असलेल्या शुल्क विनिमय कायदा आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार, राज्य शासनाने शाळांच्या फीबाबत शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी कोणतीही फी वाढ करू नये. तसेच शैक्षणिक सुविधांचा वापर करावा लागला नाही. त्यामुळे खर्च कमी होणार असल्याने फी कमी करावी, असे निर्देश दि. ८ मे २०२० रोजीच्या आदेशाने दिलेले आहेत. त्यानुसार शासन आदेशीची अंमलबजावणी न करणाºया शाळा व संस्थाचालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्राहक पंचायत महाराष्ट्र नाशिक विभागतर्फे  विभागीय अध्यक्ष प्रा. मार्तंड जोशी, अरुण भार्गवे, जिल्हाध्यक्ष  सुधीर काटकर, महानगराध्यक्ष अ‍ॅड. सुरेंद्र सोनवणे यांनी शिक्षण आयुक्त यांना दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातून केली आहे. ग्राहक पंचायतीच्या मागणी * यंदाच्या वर्षी शाळा, महाविद्यालयांनी फी वाढ करू नये.* शाळेची फी ४० ते ५० टक्के कमी करण्यात यावी. * शासन आदेशाची अंमलबजावणी न करणाºया संस्थाचालकांवर कारवाई करावी.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकSchoolशाळाStudentविद्यार्थीEmployeeकर्मचारी