शहरं
Join us  
Trending Stories
1
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
2
"हनुकाची पहिली मेणबत्ती...!", ऑस्ट्रेलियात ज्यूंच्या उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारावर इस्रायलची पिहिली प्रतिक्रिया 
3
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
4
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
5
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
6
नितिन नबीन यांची नड्डांच्या जागी BJP अध्यक्षपदी निवड होताच PM मोदींची पोस्ट, म्हणाले...
7
U19 Asia Cup 2025 : कोण आहे Aaron George? पाक विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियासाठी ठरला ‘संकटमोचक’
8
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
9
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
10
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्याला पकडले अन्...
11
Pune Crime: "अमोलला सोड, माहेरी जा; नाही गेली तर तुला..."; विवाहितेला पतीच्या गर्लफ्रेंडकडून धमकी, प्रकरण काय?
12
औसा-वानवडा रस्त्यावर जळीतकांड; कारसह तरुणाचा झाला कोळसा, घातपाताची शक्यता
13
Nitin Nabin: चार वेळा आमदार, बिहारमध्ये मंत्री; भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नबीन कोण आहेत?
14
सिडनी येथे जगप्रसिद्ध बॉन्डी बीचवर अंदाधुंद गोळीबार; दोन हल्लेखोर ताब्यात, १० पर्यटकांचा जीव घेतला
15
लियोनेल मेस्सीला भेटून खूश झाली करीना कपूरची दोन्ही मुलंं, फुटबॉलपटूसोबत फोटो व्हायरल
16
IND vs SA T20I : टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हममधून जसप्रीत बुमराह OUT; कारण...
17
बंगालमध्ये बिहारपेक्षाही अधिक मतांना कात्री, आकडा ५८ लाखांवर; टॉप-5 मध्ये ममतांचाही मतदारसंघ! TMC चं टेन्शन वाढणार?
18
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
19
पीएम सूर्य घर : मोफत वीज योजनेसाठी कसा करायचा ऑनलाईन अर्ज? सोपी आहे पद्धत, एका क्लिकवर जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस
20
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
Daily Top 2Weekly Top 5

नांदूरमधमेश्वरसह कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यात ‘नो-एन्ट्री’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 20:42 IST

विनापरवाना पर्यटकांची वाहने अभयारण्य क्षेत्रात आल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून तत्काळ त्यांना अभयारण्यक्षेत्रातून बाहेर काढले जावे यासाठी चौकसपणे नियमित गस्त वाढवावी, असेही आदेशात त्यांनी म्हटले आहेत.

ठळक मुद्देआदेश मंगळवारपासून लागू होणार आहे३१ मार्चपर्यंत संपूर्णत: बंद ठेवण्याचे आदेश चारही अभयारण्यांचे प्रवेशद्वार संपूर्णत: बंद

नाशिक : राज्यात कोरोना आजाराची लागण झालेल्या रुग्णांचा आकडा ३९ वर पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर सर्वत्र दक्षता घेतली जात असून, खबरदारीचा उपाय म्हणून नाशिक वनवृत्त विभागाचे मुख्य वनसंरक्षक तथा वन्यजीव विभागाचे वनसंरक्षक अनिल अंजनकर यांनी नांदूरमधमेश्वर, कळसूबाई-हरिश्चंद्रगड, यावल आणि अनेर डॅम हे चारही अभयारण्य ३१ मार्चपर्यंत पर्यटकांसाठी बंद ठेवण्याचे आदेश सोमवारी (दि.१६) काढले.नाशिकच्या निफाड तालुक्यातील प्रसिद्ध नांदूरमधमेश्वरसह अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा पर्यटन क्षेत्रातील कळसूबाई हरिशचंद्रगड अभयारण्य, धुळे जिल्ह्यातील अनेरडॅम, जळगाव जिल्ह्यातील यावल अभयारण्यात मोठ्या संख्येने पर्यटकांचा राबता असतो. त्यामुळे नाशिक वन्यजीव विभागाने या चारही अभयारण्यांचे प्रवेशद्वार मंगळवारपासून येत्या ३१ मार्चपर्यंत संपूर्णत: बंद ठेवण्याचे आदेश काढले आहेत. याबाबतची सूचनापत्रक संबंधित वनपरिक्षेत्राच्या वनक्षेत्रपालांना रवाना करण्यात आले आहे. या अभयारण्यक्षेत्रात पर्यटकांची कुठल्याहीप्रकारे गर्दी होणार नाही, यासंबंधित दक्षता घेतली जावी, असे अंजनकर यांनी काढलेल्या पत्रात म्हटले आहे. पर्यटकांची वाहने अभयारण्यक्षेत्रात तपासणी नाक्यांवरून कोणत्याही मार्गाने प्रवेश करणार नाहीत, याबाबत संबंधित वनक्षेत्रपाल, वनपाल, वनरक्षकांनी काटेकोरपणे काळजी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. विनापरवाना पर्यटकांची वाहने अभयारण्य क्षेत्रात आल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून तत्काळ त्यांना अभयारण्यक्षेत्रातून बाहेर काढले जावे यासाठी चौकसपणे नियमित गस्त वाढवावी, असेही आदेशात त्यांनी म्हटले आहेत. हा आदेश मंगळवारपासून लागू होणार आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसnandurmadhmwshwerनांदूरमधमेश्वरwildlifeवन्यजीवtourismपर्यटनforest departmentवनविभाग