शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांची भेट घेतली; 'तुतारी' सोडून भाजपला पाठिंबा देताच अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
2
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
3
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
4
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
5
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
6
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
7
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
8
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
9
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
10
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
11
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
12
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
13
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल
14
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
15
अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?
16
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
17
MRF Share Price: एमआरएफ देणार आतापर्यंतचा सर्वाधिक डिविडंड, मोठ्या विक्रीमुळे शेअर्स ४ टक्क्यांपर्यंत घसरले
18
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
19
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
20
Apple नं केला कमाईचा रकॉर्ड; एका दिवसात Mukesh Ambani यांच्या नेटवर्थपेक्षा अधिक वाढलं मार्केट कॅप

तिवरेच काय, पण कोणतंही धरण खेकड्यांमुळे फुटणं अशक्यच; तज्ज्ञांचं मत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2019 6:30 PM

तिवरे धरण फुटल्यानंतर प्रशासनात ब्लेमगेम सुरू

ठळक मुद्देधरणांच्या सुरक्षीतेकडे होतेय दुर्लक्षअनेक समित्या नियुक्त पण उपयोग नाही

नाशिक : तिवरे धरण फुटून जीवितहानी झाली. आता ब्लेम गेम सुरू झाल्यानंतर हे धरण चक्क खेकड्यांमुळे फुटल्याचे जलसंधारण राज्यमंत्री तर्कट तानाजी सावंत यांनी केल्यानंतर त्यावरून बरीच चर्चा सुरू झाली असली तरी खेकड्यांमुळे अशाप्रकारे धरण किंवा कालवे फुटत नसतात. धरण फुटण्याची वेगवेगळी शास्त्रोक्त कारणे आहेत. धरणाच्या सुरक्षिततेविषयी अभियंत्याची उदासीनता आणि दुर्लक्ष तसेच दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची कोणत्याही सरकारची नसलेली मानसिकता असे अनेक दोष व्यवस्थेत असल्याचे स्पष्ट मत मेरीचे (महाराष्टÑ अभियांत्रिकी संशोधन संस्था) माजी महासंचालक आणि जलतज्ज्ञ डी. एम. मोरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.

प्रश्न : तिवरे धरण फुटल्यानंतर खेकड्यांना दोष दिला जात आहे, त्याविषयी तुमचे काय मत आहे.मोरे : खेकड्यांमुळे धरण फुटते असे म्हणणे चुकीचे आहे. धरणाची रुंदी खूप असते. त्याशिवाय त्याची बांधणी मजबूत असते. त्यामुळे खेकड्यांनी धरण पोखरले म्हणून ते फुटले असे म्हणणे अत्यंत चुकीचे आहे. धरण फुटण्याची अनेक कारणे आहेत. धरण बांधताना कामात त्रुटी असेल तर काळी माती योग्य पध्दतीने भरली नसेल किंवा त्याची दबाई योग्य पध्दतीने झाले नसेल तर धरण फुटू शकते, परंतु ते एकाएकी फुटत नाही. धरणातून बाहेर पडणारे पाणी नियमितपणे स्वच्छ असेल तर अडचण नसते. परंतु मातकट किंवा गढूळ पाणी बाहेर आले तर लक्षात घ्यायला पाहिजे. अशावेळी त्रुटीचा शोध घेऊन दुरुस्ती झाली पाहिजे. १९६१-६२ मध्ये पानशेत धरण फुटले तेव्हादेखील अशाच प्रकारे माती वाहून येत होती, त्यामुळे त्याकडे लक्ष दिले पाहिजे. परंतु मानवी चुका झाल्यानंतर त्यात खेकड्यांमुळे धरण फुटले, असे म्हणणे अत्यंत चुकीचे आहे. पुण्यात पर्वतीजवळ कालवा फुटला होता, तेव्हादेखील हेच कारण देण्यात आले होते.

प्रश्न : धरण सुरक्षिततेबाबत सध्या व्यवस्था कशी आहे, त्याचा कितपत उपयोग होतो?मोरे : गेल्या दहा वर्षांपासून धरण सुरक्षिततेचा आढावा घेण्यासाठी शासनाने अनेक समित्या नियुक्त केल्या आहेत. यात जलसंपदा खात्यातील निवृत्त अधिकाऱ्यांचा सामावेश करून धरणांची पाहणी करून अभ्यासाचे काम देण्यात आले आहे, परंतु त्यातून काहीच साध्य झालेले नाही. संबंधित अभियंत्यांनी आणि खात्याने त्यातून काहीच धडा घेतला नाही. धरणांच्या सुरक्षिततेसाठी जागतिक बॅँकेने निधी मंजूर केला आहे. ९४० कोटी रुपयांचा हा निधी आहे, परंतु त्यावर निर्णय नाही. तिवरे धरणाची दुर्घटना घडल्यानंतर मेरीत अलीकडेच नाशिकमध्ये बैठक झाली. त्यात १६७ धरणांच्या दुरुस्तीसाठी प्राधान्यक्रम ठरविण्याचे ठरवण्यात आले.मुलाखत- संजय पाठक 

टॅग्स :NashikनाशिकDamधरणGovernmentसरकारIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पRatnagiri Tiware Damरत्नागिरी तिवरे धरण