शहरं
Join us  
Trending Stories
1
बाजारात 'सुवर्ण' धास्ती, देशाला बचतीची संधी; देशाला 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' बनवण्याचा निर्धार
2
आजचे राशी भविष्य: १२ मे २०२६: आर्थिक लाभ होईल, आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल
3
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
4
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
5
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
6
टिटवाळ्यात एक हजार चाळी बेकायदा, भूमाफियांकडे दुर्लक्ष; केडीएमसी महापालिकेसह पोलिसांचाही कानाडोळा
7
युद्धाचा भडका उडणार? अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा 'तो' प्रस्ताव फेटाळला, चिंता वाढली
8
मुंबईसह राज्यातील दुकाने, हॉटेल्स, मॉल्स २४ तास सुरू का नाहीत? उद्योग मंत्रालयाने निर्णय घेऊनही अंमलबजावणी नाही
9
अंबरनाथमध्ये आता शिंदेसेनेने भाजपपुढे ठेवला युतीचा प्रस्ताव, राजकीय खेळीची भाजपकडून चाचपणी
10
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
11
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
12
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
13
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
14
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
15
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
16
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
17
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
18
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
19
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
20
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
Daily Top 2Weekly Top 5

उपनगराध्यक्षपदी निर्मला भदाणे

By admin | Updated: December 30, 2016 23:24 IST

सटाण्यात बिनविरोध निवड : शहर विकास आघाडी; भाजपाची सत्ता स्थापन

सटाणा : संपूर्ण शहराचे लक्ष लागून असलेल्या येथील नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत अखेरच्या क्षणी शहर विकास आघाडी व भाजपाने हातमिळवणी करत भाजपाच्या निर्मला एकनाथ भदाणे या बिनविरोध निवडून आल्या, तर स्वीकृत नगरसेवकपदीही आघाडीच्या डॉ. विद्या सोनवणे व भाजपाचे मनोहर देवरे यांची निवड करून पालिकेत आघाडी व भाजपाने सत्ता स्थापन केली आहे. या सत्तास्थापनेमुळे नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी भाजपा पक्षांतराचे स्पष्ट संकेत दिल्याने आगामी काळात शहराबरोबरच तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. येथील पालिका निवडणुकीत शहर विकास आघाडीचे सुनील मोरे यांनी करिष्मा दाखविल्यानंतर शहर विकासासाठी मोरे यांनी भाजपाकडे जाण्याचा मार्ग पसंत केला होता. भाजपाच्या काही बंडखोरांनी पक्षश्रेष्ठींच्या गाठीभेटीदेखील घडवून आणल्या होत्या, मात्र त्याला विरोध करून मोरे यांचा मार्ग खडतर केला होता. दरम्यान, दोन दिवसांपासून माजी नगराध्यक्ष बाळासाहेब सोनवणे व नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी शहर विकासासाठी एकत्र येत सत्ता स्थापण्यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या. मात्र पदांच्या वाटाघाटीवरून चर्चा फिस्कटली आणि सत्ता स्थापनेच्या आशा मावळल्या होत्या. आज पालिका सभागृहात नगराध्यक्ष तथा पिठासीन अधिकारी सुनील मोरे यांनी उपनगराध्यक्षपदाच्या व स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीसाठी नगरसेवकांची विशेष सभा बोलावली होती. उपनगराध्यक्ष पदासाठी भाजपाच्या निर्मला भदाणे, राष्ट्रवादीचे काका सोनवणे, शमा मन्सुरी, शहर विकास आघाडीच्या सुवर्णा नंदाळे यांनी निर्धारित वेळेत उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र अखेरच्या क्षणी भाजपाचे जिल्हाध्यक्ष दादा जाधव, निरीक्षक नंदकुमार खैरनार, तालुकाध्यक्ष संजय भामरे व आघाडीचे नगराध्यक्ष सुनील मोरे, गटनेते संदीप सोनवणे यांची गुप्त बैठक होऊन एकत्रित सत्ता स्थापनेचा निर्णय घेतला. त्यानंतर आघाडीच्या उमेदवार सुवर्णा नंदाळे यांनी अंतिम क्षणी अर्ज माघारी घेऊन भाजपाच्या उमेदवार निर्मला भदाणे यांना बाय दिला. आघाडी आणि भाजपाच्या हातमिळवणीमुळे आणि अपेक्षित संख्याबळ नसल्यामुळे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे उमेदवार काका सोनवणे व शमा मन्सुरी यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने निर्मला भदाणे यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले.
उपनगराध्यक्षपदाच्या निवडीनंतर गुरुवारी स्वीकृत नगरसेवकांच्या दोन जागांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात निर्धारित वेळेत दाखल करण्यात आलेले अर्ज आज बंद लिफाफ्यात मुख्याधिकारी हेमलता डगळे यांच्याकडे पाठविण्यात आले होते. तो बंद लिफाफा आज नगराध्यक्ष तथा पिठासीन अधिकारी मोरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. या दोन जागांसाठी भाजपाकडून किशोर भांगडिया, सुहास पवार, मनोहर देवरे, आघाडीकडून डॉ.विद्या सोनवणे तर राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून फारूख शेख यांनी अर्ज दाखल केले होते. मात्र अर्ज छाननीत भांगडिया, पवार, शेख या तिघांचे अर्ज अवैध ठरल्याने स्वीकृत नगरसेवकपदी मनोहर देवरे व डॉ.विद्या सोनवणे यांची बिनविरोध निवड झाल्याचे मोरे यांनी घोषित केले. बिनविरोध निवडीनंतर नगराध्यक्ष मोरे, मुख्याधिकारी हेमलता डगळे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष दादा जाधव यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा शाल, नारळ देऊन सत्कार केला. त्यानंतर नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष निर्मला भदाणे, नगराध्यक्ष सुनील मोरे, स्वीकृत नगरसेवक मनोहर देवरे, डॉ.विद्या सोनवणे, नगरसेवक दिनकर   सोनवणे, संदीप सोनवणे, महेश देवरे, काका सोनवणे, बाळू बागुल,  राहुल सोनवणे, राकेश खैरनार, दीपक पाकळे, मुन्ना शेख, सोनाली बैताडे, सुनीता मोरकर, संगीता देवरे आदिंनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन   केले. (वार्ताहर)