शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
2
सनरायझर्स हैदराबादची फिल्डींग लैय भारी! आयुष बदोनी, निकोलस पूरन यांनी वाचवली LSG ची लाज
3
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
4
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
5
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
6
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
7
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
8
वादावर पडदा? सॅम पित्रोदांनी दिला IOC अध्यक्षपदाचा राजीनामा, पक्षानेही तात्काळ स्वीकारला
9
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
10
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
11
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
12
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
13
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
14
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
15
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
16
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
17
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
18
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
20
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...

दहावीच्या पुनर्मूल्यांकनात नऊ निकाल बदलले ; १४४ प्रकरणात गुणांत बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 9:21 PM

शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०१९च्या पेपर तपासणीतील उणिवांमुळे तब्बल १४४  विद्यार्थ्यांचे गुणांमध्ये बदल झाला असून, नऊ विद्यार्थ्यांचा निकालच बदलला गेल्याने पेपर तपासणीत शिक्षकांकडून होणारा निष्काळजीपणा पुन्हा एकदा उघड झाला आहे. पेपर तपासणीतील या निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.  अशा निष्काळजीपणाचे बळी ठरलेल्या विद्यार्थ्यांना मात्र विनाकारण मनस्ताप सहन करावा लागत असून, पुढील शैक्षणिक अभ्यासक्रमाचे प्रवेश घेण्याच्या कालावधीत विनाकारण विभागीय शिक्षण मंडळाच्या फेºया घालाव्या लागत असल्याने पालक व विद्यार्थ्यांकडून रोष व्यक्त होत आहे. 

ठळक मुद्देपुनर्मूल्यांकनात दहावीच्या पेपर तपासणीतील निष्काळजीपणा उघड नऊ निकाल बदलले ; १४४ विद्यार्थ्यांच्या गुणांत बदल

नाशिक  : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०१९च्या पेपर तपासणीतील उणिवांमुळे तब्बल १४४  विद्यार्थ्यांचे गुणांमध्ये बदल झाला असून, नऊ विद्यार्थ्यांचा निकालच बदलला गेल्याने पेपर तपासणीत शिक्षकांकडून होणारा निष्काळजीपणा पुन्हा एकदा उघड झाला आहे. पेपर तपासणीतील या निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत  आहे. अशा निष्काळजीपणाचे बळी ठरलेल्या विद्यार्थ्यांना मात्र विनाकारण मनस्ताप सहन करावा लागत असून, पुढील शैक्षणिक अभ्यासक्रमाचे प्रवेश घेण्याच्या कालावधीत विनाकारण विभागीय शिक्षण मंडळाच्या फेºया घालाव्या लागत असल्याने पालक व विद्यार्थ्यांकडून रोष व्यक्त होत आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या शालांत प्रमाणपत्र परीक्षेत गुण पडताळणीसाठी २४४ विद्यार्थ्यांनी तर , छायांकित प्रति मिळविण्यासाठी ८१५ व  पुनर्मूल्यांकानासाठी १९२ विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केले होते. त्यापैकी नऊ विद्यार्थ्यांचे निकाल बदलून ते उत्तीर्ण झाले. परंतु विद्यार्थ्यांना हे निकाल मिळविण्यासाठी जवळपास जून महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्याची प्रतीक्षा करावी लागली. तोपर्यंत अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश अर्जाचा भाग दोन भरण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. त्यामुळे अन्य विद्यार्थ्यांच्या तुलनेत गुणपडताळणी आणि पुनर्मूल्यांकनाच्या फेऱ्यात अडकलल्या विद्यार्थ्यांना अर्ज करताना कमी वेळ मिळाला होता, तर जुलै महिन्यात घेण्यात आलेल्या पुरवणी परीक्षेच्या निकालाच्या बाबतीतही असाच प्रकार समोर आला आहे. जुलै महिन्यात झालेल्या परीक्षेच्या निकालानंतर गुणपडताळणीसाठी २४, छायांकित प्रतिसांठी ४१ व पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज प्राप्त झाले होते. यातील पुनर्मूल्यांकनात सहा प्रकरणांमध्ये गुणांमध्ये बदल झाला असून, एका निकालात बदल झाला, तर एक प्रकरण अजूनही प्रलंबित असून त्यावरील निकाल अंतिम टप्प्यात आहे. अशाप्रकारे पेपर तपासणीत राहणाऱ्या त्रुटींमुळे विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असल्याने पेपर तपासणीतील उणिवा दूर करण्याची मागणी पालकांकडून होत आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकSSC Resultदहावीचा निकालStudentविद्यार्थीTeacherशिक्षक