निमाणी बसस्थानकाची दुरवस्था ‘जैसे थे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 12:41 AM2018-08-30T00:41:27+5:302018-08-30T00:42:00+5:30

पावसाळ्यामुळे निमाणी बसस्थानकात पावसाचे पाणी साचून खड्डे व चिखलाचे साम्राज्य पसरले असून, त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होण्याबरोबर एसटी बसचे नुकसान होत असल्याने एसटी प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन खड्डे बुजवावेत, अशी मागणी केली जात आहे.

 Nimani bus station's' drought 'was like' | निमाणी बसस्थानकाची दुरवस्था ‘जैसे थे’

निमाणी बसस्थानकाची दुरवस्था ‘जैसे थे’

Next

पंचवटी : पावसाळ्यामुळे निमाणी बसस्थानकात पावसाचे पाणी साचून खड्डे व चिखलाचे साम्राज्य पसरले असून, त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होण्याबरोबर एसटी बसचे नुकसान होत असल्याने एसटी प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन खड्डे बुजवावेत, अशी मागणी केली जात आहे.  गत काही दिवसांपासून निमाणी बसस्थानकाची दुरवस्था झाल्याने एसटी प्रशासनाकडून तत्काळ दखल घेतली जाऊन बसस्थानकातील खड्डे बुजवण्याचे काम केले जाण्याची शक्यता होती. मात्र प्रशासनाने वारंवार याकडे दुर्लक्ष केल्याने एसटी प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचे दर्शन घडत आहे. पावसाळा सुरू होण्याच्या अगोदरपासून बसस्थानकात खड्ड्यांचे साम्राज्य पसरलेले आहे. या खड्ड्यांमुळे बसस्थानकात येणाऱ्या प्रवाशांना तसेच बसचालकांनाही खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागतो. बसस्थानकात बस नेताना तसेच आणताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. प्रवाशांची गैरसोय होण्याबरोबर एसटी बसचे नुकसान होत असल्याने एसटी प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन खड्डे बुजवावेत, अशी मागणी केली जात आहे.

Web Title:  Nimani bus station's' drought 'was like'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.