शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

गुढ्या-तोरणांनी नववर्षाचे स्वागत

By admin | Updated: March 28, 2017 01:19 IST

नाशिक : चैत्र शुद्ध प्रतिपदा आणि साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणारा गुढीपाडवा अर्थात नववर्षाच्या स्वागतासाठी नाशिककर सज्ज झाले आहेत

नाशिक : चैत्र शुद्ध प्रतिपदा आणि साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणारा गुढीपाडवा अर्थात नववर्षाच्या स्वागतासाठी नाशिककर सज्ज झाले आहेत. मंगळवारी (दि.२८) पहाटे सहापासून शहरातील विविध उपनगरांमधून हिंदू नववर्षाचे स्वागत स्वागतयात्रा, घरोघरी गुढ्या उभारून व नवीन उद्योग व्यवसायांचे विधिवत पूजन करून पारंपरिक पद्धतीने केले जाणार आहे. याशिवाय गृहोपयोगी वस्तू, वाहन, सोने-चांदी आदि विविध वस्तूंच्या खरेदीसाठीचा शुभमुहूर्त असल्याने काहींनी त्यांची आगाऊ बुकिंग करून ठेवली आहे तर अनेकजण पाडव्याच्या दिवशीच खरेदीचा मुहूर्त साधणार आहेत. गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर घरोघरी उभारल्या जाणाऱ्या गुढ्यांसाठी लागणारे हार-कडे, काठ्या, वस्त्र, कडुनिंबाचा पाला, फुले आदिंच्या दुकानांवर सोमवारी रात्री उशिरापर्यंत रेलचेल दिसून येत होती. पाडवा आणि श्रीखंड हे समीकरणच असल्याने अनेकांनी आपापल्या आवडत्या फ्लेवरर्सचे (आम्रखंड, केशर, इलायची, ड्रायफुट) श्रीखंड खरेदी करण्यावर भर दिला. पाडव्याच्या मुहूर्तावर नाशिककरांनी इलेक्टॉनिक वस्तू, दुचाकी व चारचाकी वाहने व घरांची खरेदी करण्यासाठी बुकिंगवर भर दिल्याचे दिसून आले. पाडव्याचा मुहूर्त साधत अनेकांनी कूलर, पंखे, एअर कंडिशनर, अ‍ॅण्ड्रॉइड मोबाइल, फ्रीज, वॉशिंग मशीन, मायक्रोवेव्ह ओव्हन, इंडक्शन कूकर आदि इलेक्ट्रॉनिक वस्तूंची आगाऊ बुकिंग केली व पाडव्याला त्याची डिलेव्हरी मिळेल, असे नियोजनही केले आहे. गुढीपाडव्याचा मुहूर्त साधत व्यावसायिकांनी चांगल्या आॅफर दिल्याने बाजारपेठेत मोठी उलाढाल पहायला मिळाली.  पाडव्याला लागणाऱ्या हार-कड्यांची मागणी पूर्ण करण्यासाठी शहरातील विविध बाजारपेठांमध्ये दुकाने सजली होती. महागाईचा फटका हार-कडे व्यावसायिकांनाही बसल्याचे दिसून आले. साखरेचे दर वाढल्याने यंदा हार-कड्यांचे दरही वाढले आहेत. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गाठींच्या लहान आकारापासून मोठ्या आकारापर्यंतचे व रंगांचेही प्रकार पहायला मिळत असून, हारांमध्येही अनेक पर्याय उपलब्ध करून देण्यात आले होते.अशी उभारा गुढीसकाळी ८.२७ नंतर गुढी उभारण्यास चांगले मुहूर्त आहेत. दरवाजाला तोरण, सडा-रांगोळी, देवपूजा आटोपून गुढी उभारतात. काठीच्या एका टोकाला केशरी वस्त्र बांधून कलशाला गंधाचे पाच पट्टे ओढून हार बांधतात. काठीला आंब्याचा डगळा, निंबाचा पाला बांधून साखरगाठीचे हार व कडे घालून गुढीची पूजा करतात. आगामी वर्ष मंगलमय जावो, यासाठी प्रार्थना करावी. हार-कडे १० ते ४० रुपये या दरात, नारळ १० रुपये या दरात मेनरोड, शालिमार, अशोकस्तंभ, रविवार कारंजा आदिंसह शहरातील सर्वच बाजारपेठांमध्ये रंगीबेरंगी हार-कड्यांची खरेदी-विक्री झाली. लाल, पिवळा व केशरी यांसह हिरवा, आकाशी असे रंग असल्याने लहान मुले आपल्या आवडीचे रंग असलेले हार-कडे विकत घेण्यासाठी आग्रह धरताना दिसत होते.