शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
4
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
5
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
6
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
7
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
8
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
9
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
10
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
11
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
12
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
13
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
14
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
15
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
16
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
17
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
18
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
19
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
20
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
Daily Top 2Weekly Top 5

नाशिककरांना नव्या वर्षाची ‘नवी भेट’

By admin | Updated: January 1, 2017 00:05 IST

नवे वर्ष नवी आशा : बसस्थानके टाकणार कात; पार्किंगची सुविधा मिळणार

नाशिक : नवे वर्ष नवे उमेद घेऊन येते त्यामुळेच सामान्यत: नव्या वर्षाविषयी नागरिकांना आकर्षण असते. व्यक्तिगत जीवनात ज्याप्रमाणे काही चांगले घडेल अशी अपेक्षा असते त्याच धर्तीवर सार्वजनिक जीवनातदेखील शहरासाठी, जिल्ह्यासाठी सकारात्मक घडण्याची अपेक्षा असते. यंदाही नववर्ष नाशिककरांना नव्या योजनांचे गिफ्ट घेऊन येणार आहे. या नव्या वर्षात शहरात अनेक योजनांची नांदी असून, शहरातील अनेक नवे प्रकल्प साकारले जाणार आहेत. शहरातील प्रमुख बसस्थानकांचे रुपडे पालटणार असून, विमानतळाच्या धर्तीवर त्यांचा विकास केला जाणार आहे. तसेच काही बसेस वायफाय केले जाणार आहेत. सामान्यत: नागरिकांच्या दृष्टिने महापालिकेशी संबंध येत असतो. नव्या वर्षात महापालिकेच्या वतीने डिजीटल कामकाजावर भर दिला जाणार असून ‘ई’पार्किंग, मॅकेनिकल पार्किंग तसेच महापुरा आधी सतर्क करणारी ई फ्लड सिस्टीम अंमलात येणार आहे. पोलिसांच्या वतीने विविध प्रकारच्या परवानग्या आॅनलाइन दिल्या जाणार आहेत.
वायफाय बस, हायफाय स्थानक
नवीन वर्ष प्रवाशांना विविध सुखसोयींसह प्रवास सुखकर करण्यावर भर देणारे असणार आहे. नाशिक शहराची प्रमुख ओळख असणारे जुने सीबीएस, मेळा बसस्थानक आणि महामार्ग बसस्थानकाचे आधुनिकीकरण केले जाणार आहे. महामार्ग बसस्थानकावर अत्याधुनिक व सर्वसोयींयुक्त असा बसपोर्ट केला जाणार आहे. सटाणा-नाशिक व मालेगाव-नाशिक या बसेसच्या फेऱ्या वाढविल्या जाणार आहेत. बसमध्ये चढताना खिडकीतून रुमाल टाकून जागा धरण्याच्या प्रकाराला पूर्णपणे पायबंद घातला जाणार आहे. बस बसस्थानकात येताच सर्व खिडक्यांच्या काचा बंद केल्या जाणार असून, प्रवाशांनी दरवाजातून रांगेत चढूनच जागा पकडणे सक्तीचे केले जाणार आहे. याची शहरातील सर्व बसस्थानकांमध्ये कडक अंमलबजावणी केली जाणार आहे. नाशिक परिक्षेत्रातील सर्व बसेसना मोफत वायफायची सुविधा दिली जाणार आहे. यात स्थानिक पातळीपासून लांबपल्ल्याच्या गाड्यांमध्येही वायफायची सुविधा मिळणार आहे. याशिवाय ‘एसटीचा प्रवास- सुखकर प्रवास’ या ब्रीदवाक्यावर भर देत जास्तीत जास्त संख्येने प्रवासी एसटी महामंडळाच्या बसमधूनच प्रवास करतील यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. यासाठी चालक, वाहक यांना उद्दिष्ट ठरवून दिले जाणार आहे.