कडवा पाणीयोजना लवकरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 18:20 IST2019-02-07T18:19:45+5:302019-02-07T18:20:23+5:30
सिन्नर शहर व उपनगरांसाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या कडवा पाणीपुरवठा योजनेच्या कामाची नगरपरिषदेतील भाजपाच्या विरोधी गटनेत्यासह नगरसेवक व मुख्याधिकाºयांनी पाहणी करुन काम जलदगतीने पूर्ण करण्यासाठी सूचना केल्या.

सिन्नर शहरासाठी कडवा धरणातून राबविण्यात पाणीयोजनेची पाहणी करतांना भाजपाचे गटनेते नामदेव लोंढे, मुख्याधिकारी व्यंकटेश दूर्वास, सुहास गोजरे, संतोष शिंदे, शीतल कानडी, वासंती देशमुख, प्रीती वायचळे, चित्रा लोंढे, मालती भोळे, अलका बोडके, रिवाज पठाण, टी. बी. बकाल, तांदळे आदि.
सिन्नर : सिन्नर शहर व उपनगरांसाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या कडवा पाणीपुरवठा योजनेच्या कामाची नगरपरिषदेतील भाजपाच्या विरोधी गटनेत्यासह नगरसेवक व मुख्याधिकाºयांनी पाहणी करुन काम जलदगतीने पूर्ण करण्यासाठी सूचना केल्या.
भाजपाचे गटनेते नामदेव लोंढे, मुख्याधिकारी व्यंकटेश दूर्वास, नगरसेवक संतोष शिंदे, सुहास गोजरे, शीतल कानडी, वासंती देशमुख, प्रीती वायचळे, चित्रा लोंढे, मालती भोळे, अलका बोडके, भाजपा अल्पसंख्याक सेलचे तालुकाध्यक्ष रिवाज पठाण, पाणीयोजनेचे टी. बी. बकाल, तांदळे यांनी सिन्नर ते कडवा धरणापर्यंत टाकण्यात आलेल्या जलवाहिनीच्या कामाची पाहणी केली.
जलवाहिनी टाकण्याच्या कामात असलेल्या अडचणी दूर करण्यासाठी भाजपाच्या नगरसेवकांकडूनही मदत केली जाईल असे भाजपाचे गटनेते नामदेव लोंढे यांनी सांगितले. जलवाहिनी टाकण्याच्या कामात काही शेतकºयांनी अडथळे आणले जात असून त्यासाठी भाजपाकडून शक्य ती मदत करुन योजनेचे पाणी सिन्नरकरांना लवकरात लवकर मिळावे यासाठी प्रयत्न केले जाईल असे लोंढे यांनी सांगितले. येत्या उन्हाळ्यापर्यंत कडवा पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी ठेकेदार व कर्मचाºयांना केल्या.