शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

रांगोळी कलेच्या पुनरूज्जीवनाची गरज : रश्मी विसपुते

By संजय पाठक | Updated: April 13, 2019 13:14 IST

नाशिक- रांगोळी ही पांरपरिक कला! प्राचीन कलेल आता नव्याने उजाळा मिळू लागला आहे. अर्थातच त्यामागे रांगोळी कलाकारांचे परिश्रम देखील कारणीभूत आहेत. नाशिकच्या रश्मी विसपुते यांनी त्यात पुढे जाऊन भव्य रांगोळी साकारण्याचा विक्रम केला आहे. ७५ फुटाची भव्य गुढी रांगोळी साकारून विक्रम केला आहे. त्याची वंडरबुक आॅफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली असून विसपुते यांना सन्मानित करण्यात आले आहे. त्याबद्दल विसपुते यांच्याशी केलेली ही बातचीत.

ठळक मुद्देगुढीच्या ७५ फुटी रांगोळीची विक्रमात नोंदवंडर बुक आॅफ रेकार्ड मध्ये नोेंदवले नावआणखी नवा विक्रम करण्याचा मानस

नाशिक- रांगोळी ही पांरपरिक कला! प्राचीन कलेल आता नव्याने उजाळा मिळू लागला आहे. अर्थातच त्यामागे रांगोळी कलाकारांचे परिश्रम देखील कारणीभूत आहेत. नाशिकच्या रश्मी विसपुते यांनी त्यात पुढे जाऊन भव्य रांगोळी साकारण्याचा विक्रम केला आहे. ७५ फुटाची भव्य गुढी रांगोळी साकारून विक्रम केला आहे. त्याची वंडरबुक आॅफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली असून विसपुते यांना सन्मानित करण्यात आले आहे. त्याबद्दल विसपुते यांच्याशी केलेली ही बातचीत.प्रश्न- रांगोळी सारख्या कलेतून विक्रम साकारण्याची कल्पना कशी काय आली.विसपुते: मला शालेय जीवनापासूनच चित्रकला आणि रांगोळीची आवड आहे.चित्रकलेत मी जीडी आर्ट नाशिकच्या कलानिकेतन मध्ये करीत आहेत. चित्रकलेचे ज्ञान आहेच, परंतु रांगोळी माझी मीच शिकले. त्याच्या संयोगातूच रांगोळी रेखाटण्याचे काम काही वर्षांपासून करते आहे. रांगोळी ही प्राचीन कला आहे त्याचे पुनरूज्जीवन करण्याचे मी ठरवले आणि त्यामुळेच रांगोळीतूनच विक्रम करण्याचे ठरविले होेते.प्रश्न: गुढीची रांगोळी ही कल्पना कशी सुचली? त्यासाठी काय परिश्रम घेतले?विसपुते: रांगोळी ही प्राचीन परंपरा आहे. तसेच गुढी पाढवा हा हिंदुचा सण आहे. त्यामुळे यानिमित्ताने भव्य गुढीच साकरण्याचे मी ठरविले. ७५ फुट गुढी साकारणे सोपे नव्हते. ती साकारण्याचे ठरविल्यानंतर मी दररोज दोन तास रांगोळी काढण्याचा सराव केला. रांगोळी काढताना सतत वाकून राहावे लागणार असल्याने पाठ दुखणे किंवा हात दुखणे होणारच होते. त्यामुळे विशेष दक्षता म्हणून योगासनेही केली. माझी बहीण वसुधा जानोरकर हीने योगासने शिकवले. त्यानंतर हा विक्रम करण्याचे ठरवले.प्रश्न: तुमच्या भव्य रांगोळीची विक्रमात नोंद झाली, त्या बद्दल काय भावना आहेत?विसपुते: रांगोळी सारख्या प्राचीन कलेल्या आधारे काही करू शकले याचा आनंद आहेच. परंतु हा विक्रम करण्यासाठी सर्वाधिक प्रोत्साहन माझ्या कुटूंबियांनी दिले. त्यांच्या पाठबळाशिवाय हे शक्यच नव्हते. याशिवाय वृंदाताई लव्हाटे यांनी हॉलसाठी जे सहकार्य केले, त्यामुळेच हा विक्रम करू शकले. आता आणखी मोठा विक्रम करण्याची गिनीज बुकासह अन्य विक्रमांत नोंद करण्याची इच्छा आहे. त्याच बरोबर रांगोळीचा प्रचार प्रसार देखील करणार आहे. पुर्वी घराबाहेर रांगोळी काढली जात असे. आता मात्र महिला नोकरदार झाल्या तसेच अन्य कारणांमुळे ही कला लोप पावत चालली आहे. त्यामुळे रांगोळीचा प्रसार देखील नजीकच्या काळात करणार आहे.मुलाखत- संजय पाठक 

टॅग्स :Nashikनाशिकgudhi padwaगुढीपाडवाartकला