शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
5
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
6
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
7
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
8
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
9
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
10
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
11
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
12
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
13
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
14
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
15
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
16
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
17
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
18
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
19
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
20
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं

कोरोना विरूध्द राजकारणविरहीत लढा देण्याची गरज !

By संजय पाठक | Published: April 08, 2021 5:05 PM

नाशिक- कोरोना काळात लढताना प्रशासकीय यंत्रणा थकल्या असतानाच जणू दुसरी लाट आल्याचे भासत आहे. बेड मिळत नाही, ऑक्सीजनची टंचाई, रेमडिसीवरचा काळाबाजार अशी गंभीर स्थितीत खरे तर आरोप प्रत्यारोपांची ही वेळ नाही हे वेगळे सांगण्याची गरज नाही. परंतु तरीही महापालिकेत सत्ता कोणाची हे बघून आरोप प्रत्याराेप हेात असतील, हे राजकीय शहाणपण नाही असे म्हणावे लागेल.  

ठळक मुद्देनिवडणूका होतच राहतील  आरोप प्रत्यारोपापेक्षा सहकार्य महत्वाचे

नाशिक- कोरोना काळात लढताना प्रशासकीय यंत्रणा थकल्या असतानाच जणू दुसरी लाट आल्याचे भासत आहे. बेड मिळत नाही, ऑक्सीजनची टंचाई, रेमडिसीवरचा काळाबाजार अशी गंभीर स्थितीत खरे तर आरोप प्रत्यारोपांची ही वेळ नाही हे वेगळे सांगण्याची गरज नाही. परंतु तरीही महापालिकेत सत्ता कोणाची हे बघून आरोप प्रत्याराेप हेात असतील, हे राजकीय शहाणपण नाही असे म्हणावे लागेल.  

महापालिकेच्या निवडणूका तोंडावर आहेत. त्यामुळे राजकारण होणे अपेक्षीत आहे परंतु राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आणि महापालिकेत भाजपची सत्ता यामुळे कोणत्याही त्रूटी आणि उणिवा शाेधून राजकारण करणे आलेच. शिवसेना त्यातून आरोप प्रत्यारोप करते तर कधी मनसे प्रश्न उपस्थित करते असे बहुतांश जाणवतच आहे. गुरूवारीही शिवसेनेच्या ज्येेष्ठ नगरसेविका सत्यभामा गाडेकर यांनी नाशिकरोड येथील बिटकेा रूग्णालयात सुविधा नाहीत म्हणून आंदोलने केले.

खरे तर कोरोना हा विषय एकट्या महापौर सतीश कुलकर्णी  किंवा भाजपा अथवा प्रशासनाचा नाही. तसेच राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असल्याने त्यांचाच हा विषय आहे असे नाही अनेक यंत्रणा, खासगी रूग्णालय, आरोग्य क्षेत्राला पुरक उद्याेग त्यांच्याकडून होणारा पुरवठा असा एकात एक गुंतलेला विषय आहे. त्यामुळे कोरेाना सारख्या आपत्तीला एकत्रीत सामोरे जाणे आवश्यक आहे. तसे हेाताना दिसत नाही.महापालिकेत भाजपची सत्ता असल्याने त्यांना कोरोना नियंत्रणात आणता येणार नाही अशी विरोधकांनी टीका करायची आणि राज्याकडून मदत मिळत नाही म्हणून भाजपानेशिवसेना आणि राष्ट्रवादीवर टीका करायची असा हा प्रकार सुरू आहे.

शहरातील नागरीकांचे जिव्हाळ्याचे प्रश्न वेगळे आहेत. त्यांना उणिवा शोधण्यात नव्हे तर आता संकट काळात आधार देणाऱ्यांची गरज आहे. आता एकेका घरात अनेक जण बाधीत असल्याने त्यांना बेड तर मिळत नाहीच शिवाय अन्य अनेक अडचणी उभ्या आहेत. आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा अशा नागरीकांना मदत करणे हे महत्वाचे आहे. मग भलेही त्याचा वापर श्रेयासाठी झाला तरी चालेल. वादापेक्षा हे परवडले अशी स्थिती आहे.

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाBJPभाजपाShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारण