गाजराच्या आकाराचा केक कापून एनएसयुआयने केला केंद्र सरकारचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 13:24 IST2018-11-05T13:20:33+5:302018-11-05T13:24:08+5:30
नाशिक जिल्हा एनएसयुआयतर्फे गाजराच्या आकाराचा केक कापून केंद्र सरकारच्या गेल्या चार वर्षातील कारभाराचा निशेध करणयात आला. यावेळी बोलताना एनएसयुआयच्या पदाधिकाऱयांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांना टिकेचे लक्ष करतानाच सरकार विरोधात देशात व राज्यात प्रचंड असंतोष असल्याचे सांगितले.

गाजराच्या आकाराचा केक कापून एनएसयुआयने केला केंद्र सरकारचा निषेध
नाशिक : जिल्हा एनएसयुआयतर्फे गाजराच्या आकाराचा केक कापून केंद्र सरकारच्या गेल्या चार वर्षातील कारभाराचा निशेध करणयात आला. यावेळी बोलताना एनएसयुआयच्या पदाधिकाऱयांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांना टिकेचे लक्ष करतानाच सरकार विरोधात देशात व राज्यात प्रचंड असंतोष असल्याचे सांगितले. तर या देशातील युवा शक्तीच हे सरकार खाली खेचेल, असे मत शहर काँग्रेसचे माजी अध्यक्ष अॅड. आकाश छाजेड यांनी व्यक्त केले.
देशातील वाढती बेरोजगारी, वाढती महागाई, पेट्रोल दरवाढ, गॅस दरवाढ, राफेल घोटाळा, शेतीमालाचे कोसळलेले भाव या सर्वसामान्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या विषयांवर मोदी व फडणवीस सरकारचे लक्ष नसून त्याऐवजी स्मारकांचे सोहळे करण्यात त्यांना रस असल्याची टीका करीत नाशिक जिल्हा एनएसयुआयच्या वतीने मोदी व सरकारच्या ४ वर्षांच्या कारभाराच्या विरोधात गाजराच्या आकाराचा केप कापून निषेध व्यक्त करण्यात आला दरम्यान, नितीन काकड यांनी आगामी काळात विद्यार्थ्यांचे संघटन करुन सरकारच्या विरोधात लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा दिला. याप्रसंगी सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. यावेळी पूर्व विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष सचिन भुजबळ, प्रदेश एनएसयुआय सचिव सागर दाते, पूनम आव्हाड, कुशल लुथरा, विशाल बेंडकुळे, सागर बागुल, अल्तमष शेख, अभिषेक छाजेड, सतीश थोरात आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.