शहरं
Join us  
Trending Stories
1
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
2
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
3
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
4
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
5
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
6
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
7
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
8
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
9
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
10
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
11
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
12
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
13
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
14
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
15
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
16
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
17
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
18
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
19
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
20
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय लोकअदालतीत तीन कोटींची नुकसानभरपाई

By admin | Updated: April 10, 2017 01:52 IST

नाशिक : राज्य विधी सेवा प्राधिकरणतर्फे आयोजित लोकअदालतीत धनादेश न वटणे, मोटार अपघात, बँक वसुली आदि प्रकरणांमध्ये तीन कोटी १९ लाख रुपये नुकसानभरपाई वसूल करण्यात आले़

 नाशिक : राज्य विधी सेवा प्राधिकरणतर्फे जिल्हा न्यायालयासह तालुका न्यायालयात आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीत धनादेश न वटणे, मोटार अपघात, बँक वसुली आदि प्रकरणांमध्ये तीन कोटी १९ लाख ८६ हजार ३०४ रुपये नुकसानभरपाई व दंडापोटी वसूल करण्यात आले़ या राष्ट्रीय लोकअदालतीत दाखल करण्यात आलेले प्रलंबित तसेच दावा दाखलपूर्व ११ हजार ७४ प्रकरणांपैकी ८९५ प्रकरणांचा यावेळी निपटारा करण्यात आला़ प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश अरुण एम. ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली या लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते़ राष्ट्रीय लोकअदालतीत जिल्हा न्यायालयासह तालुका न्यायालयात प्रलंबित चार हजार ६९९ प्रकरणांपैकी ५४४ प्रकरणे निकाली काढण्यात येऊन दंडापोटी दोन कोटी ७९ लाख ५२ हजार ६६३ रुपये, तर दावा दाखलपूर्व ६ हजार ३७५ प्रकरणांपैकी ३५१ प्रकरणे निकाली काढण्यात येऊन ४० लाख ३३ हजार ६४१ रुपये वसूल झाले़ या अदालतीमध्ये ठेवण्यात आलेल्या कौटुंबिक ५०१ पैकी ३४ प्रकरणांवर यशस्वी तोडगा काढण्यात आला़ न्यायालयातील प्रलंबित २ हजार २८ फौजदारी दाव्यांपैकी २९५ दावे निकाली काढून दंडापोटी ३ लाख ७७ हजार ७५० रुपये, धनादेश न वटल्याच्या १ हजार २१० प्रकरणांपैकी १२० दावे निकाली काढून दंडापोटी एक कोटी ३६ हजार १३६, बँक वसुलीच्या २१३ प्रकरणांपैकी ९ वसुलीचे दावे निकाली काढून दोन लाख ८८ हजार ७९३ रुपये, मोटार अपघाताच्या २४० प्रकरणांपैकी ५७ प्रकरणे निकाली काढून दंडापोटी १ कोटी ७० लाख ५७ हजार १४ रुपये, कामगार न्यायालयातील २९ प्रकरणांपैकी ६ प्रकरणे निकाली काढून दंडापोटी १ लाख ९२ हजार ९७० रुपये, जमीन अधिग्रहणाच्या ७१ दावे ठेवण्यात आले, मात्र त्यावर तोडगा निघाला नाही़ इतर ४०७ दिवाणी दाव्यांपैकी २३ दावे निकाली काढण्यात आले़ या लोकअदालतीमधील दाव्यांच्या निपटाऱ्यासाठी जिल्हा व तालुका न्यायालयामध्ये विविध पॅनल्स तयार करण्यात आले होते़ जिल्हा न्यायालयात झालेल्या लोकअदालतीत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव वि. र. अगरवाल, जिल्हा सरकारी वकील अजय मिसर यांच्यासह न्यायिक अधिकारी, वकील, पक्षकार व जिल्हा न्यायालयातील कर्मचारी उपस्थित होते़ (प्रतिनिधी)