नाशिकमध्ये लाखोंचा फटाक्यांच्या अवैध साठा जप्त

By Admin | Updated: March 13, 2017 21:33 IST2017-03-13T21:33:57+5:302017-03-13T21:33:57+5:30

शिवाजीनगर परिसरात एका शेतामधील खोलीत लाखो रुपये किमतीचा फटाक्यांचा साठा अवैधरित्या करण्यात आल्याची माहिती गंगापूर पोलिसांना मिळाली होती.

Nasik seized illegal fireworks worth lakhs of firecrackers | नाशिकमध्ये लाखोंचा फटाक्यांच्या अवैध साठा जप्त

नाशिकमध्ये लाखोंचा फटाक्यांच्या अवैध साठा जप्त


नाशिक : शिवाजीनगर परिसरात एका शेतामधील खोलीत लाखो रुपये किमतीचा फटाक्यांचा साठा अवैधरित्या करण्यात आल्याची माहिती गंगापूर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरिक्षक महेश देवीकर व त्यांच्या गुन्हे शोध पथकाने दुपारच्या सुमारास शिवाजीनगर येथील राजाराम पाटील यांच्या शेतावरील संशयास्पद खोलीची झडती घेतली. यावेळी २४ लाख रुपये किमतीचे फटाके आढळून आले. फटाके खरेदी केलेल्या पावतीवर कैलास जाधव यांचे नाव आढळून आल्याने पोलिसांनी जाधव यांच्यावर विनापरवाना स्फोटक पदार्थांचा साठा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या फटाक्यांच्या साठ्याबाबत अग्निशमन विभागाकडून परवानगी घेण्यात आली आहे का, याबाबतही पोलिसांनी चाचपणी केली;मात्र अशा ठिकाणी कुठल्याही प्रकारे फटाक्यांच्या साठवणूकीला परवानगी दिली नसल्याची माहिती महापालिकेच्या अग्निशमन विभागाने दिल्यानंतर पोलिसांनी तत्काळ फटाक्यांचा साठा जप्त करण्याची कारवाई केल्याची माहिती देवीकर यांनी दिली आहे.

Web Title: Nasik seized illegal fireworks worth lakhs of firecrackers