लासलगावला पिकअप वाहनासह अवैध मद्यसाठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 18:40 IST2017-12-27T18:37:03+5:302017-12-27T18:40:29+5:30
नाशिक : ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर राज्यात होणाºया चोरट्या मद्यवाहतूकीस आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने तपासणी नाके तसेच भरारी पथके कार्यान्वित केले असून येवला विभागाच्या अधिकाºयांनी चांदवड-लासलगाव रस्त्यावरील टाकळी शिवारात सापळा रचून मद्य व वाहनासह अडीच लाखाचा मद्यसाठा जप्त केला आहे़

लासलगावला पिकअप वाहनासह अवैध मद्यसाठा जप्त
नाशिक : ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर राज्यात होणा-या चोरट्या मद्यवाहतूकीस आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने तपासणी नाके तसेच भरारी पथके कार्यान्वित केले असून येवला विभागाच्या अधिका-यांनी चांदवड - लासलगाव रस्त्यावरील टाकळी शिवारात सापळा रचून मद्य व वाहनासह अडीच लाखाचा मद्यसाठा जप्त केला आहे़
लासलगाव परिसरातून मद्याची चोरटी वाहतूक केली जात असल्याची माहिती येवला विभागाचे निरीक्षक सचिन श्रीवास्तव यांना मिळाली होती. त्यानुसार, पथकाने चांदवड-लासलगाव रस्त्यावरील टाकळी शिवारातील भारत पेट्रोल पंपासमोर सापळा रचला होता़ रस्त्याने जाणाºया संशयास्पद महिंद्रा पीकअप व्हॅनला (एमएच १५ एफक्यु ०३२०) रोखून तपासणी केली असता, त्यामध्ये अवैध मद्यसाठा आढळून आला़ या मद्यसाठ्यामध्ये मॅकडॉवेलच्या (१८० मि.लीच्या) १४४ बाटल्या, देशीदारू भिंगरी संत्राच्या (१८० मि.लिच्या) ११४० बाटल्या, प्रिन्स संत्राच्या (१८० मि.लिच्या) ९६० बाटल्यांचा समावेश आहे़
राज्य उत्पादन शुल्कने मद्यसाठा व व्हॅन असा २ लाख ५७ हजार ८४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून संशयित दीपक बाळू पोतदार (२५, रा. औरंगाबाद नाका, नाशिक), विशाल बाळू नेटावटे (२५, रा. पंचवटी) या दोघांना अटक करून गुन्हा दाखल केला आहे. उप आयुक्त प्रसाद सुर्वे, अधीक्षक सी.बी. राजपूत, उपअधीक्षक गणेश बारगजे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सचिन श्रीवास्तव, वाय. पी. रतवेकर, डी. आर. नेमणार यांच्या पथकाने ही कामगिरी केली़