औरंगाबाद महामार्गावर महिलेचे मंगळसूत्र खेचले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 17:16 IST2018-04-27T17:16:50+5:302018-04-27T17:16:50+5:30
नाशिक : दुचाकीवरील संशयितांनी पादचारी महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत खेचून नेल्याची घटना गुरुवारी (दि़ २६) दुपारच्या सुमारास औरंगाबाद महामार्गावरील राजे शिवाजी लॉन्सजवळ घडली़

औरंगाबाद महामार्गावर महिलेचे मंगळसूत्र खेचले
नाशिक : दुचाकीवरील संशयितांनी पादचारी महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत खेचून नेल्याची घटना गुरुवारी (दि़ २६) दुपारच्या सुमारास औरंगाबाद महामार्गावरील राजे शिवाजी लॉन्सजवळ घडली़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुुंबईतील भांडूप येथील रहिवासी संध्या बलराम रखमे (३५, रा़ रोहिदासनगर, वॉटर टँक हिल रोड, भांडूप पश्चिम) या दुपारी पावणेतीन वाजेच्या सुमारास आपल्या नणंदेसह औरंगाबाद महामार्गावरील लॉन्सजवळ उभ्या होत्या़ यावेळी काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दोघा संशयितांनी त्यांच्या गळ्यातील पाच तोळे वजनाचे साठ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र असलेली पोत खेचून नेली़
या प्रकरणी रखमे यांच्या फिर्यादीनुसार आडगाव पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़