मद्यविक्री दुकानाची टोळक्याकडून तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 22:18 IST2018-03-23T22:18:21+5:302018-03-23T22:18:21+5:30

नाशिक : मद्य पिण्याच्या कारणावरून मद्य दुकानाच्या मालकासोबत वाद घालून एका टोळक्याने दुकानातील लॅपटॉप, सीसीटीव्ही व साहित्याची तोडफोड केल्यानंतर दुकानास आग लावण्याचा प्रयत्न केल्याची घटना बुधवारी (दि़ २१) रात्रीच्या सुमारास पंचवटीतील अमृतधाममध्ये घडली़

nashik,wine,shop,owner,attack | मद्यविक्री दुकानाची टोळक्याकडून तोडफोड

मद्यविक्री दुकानाची टोळक्याकडून तोडफोड

ठळक मुद्देपंचवटीतील घटना ; दुकानास आग लावण्याचा प्रयत्नसंशयित दत्ता कुटे व त्याच्या सहा साथीदारांविरोधात गुन्हा दाखल

नाशिक : मद्य पिण्याच्या कारणावरून मद्य दुकानाच्या मालकासोबत वाद घालून एका टोळक्याने दुकानातील लॅपटॉप, सीसीटीव्ही व साहित्याची तोडफोड केल्यानंतर दुकानास आग लावण्याचा प्रयत्न केल्याची घटना बुधवारी (दि़ २१) रात्रीच्या सुमारास पंचवटीतील अमृतधाममध्ये घडली़

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पंचवटीतील हनुमाननगरमधील रहिवासी पद्मसिंह काळे यांचे बालाजी संकुलमध्ये मद्यविक्रीचे दुकान आहे़ बुधवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास संशयित दत्ता कुटे हा आपल्या सहा साथीदारांसमवेत आला़ या ठिकाणी दुकानमालक काळे व त्यांचा मावसभाऊ पंकज साळुंखे यांच्याशी वाद घालून कुटे व त्याच्या साथीदारांनी शिवीगाळ सुरू केली़ यानंतर दुकानाच्या काउंटरवरील वस्तू, लॅपटॉप व सीसीटीव्ही कॅमेरा फोडून नुकसान केले तसेच दुकानाच्या पुढील पडद्यावर रॉकेल टाकून आग लावली़

या प्रकरणी काळे यांच्या फिर्यादीवरून संशयित दत्ता कुटे व त्याच्या सहा साथीदारांविरोधात पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Web Title: nashik,wine,shop,owner,attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.