नाशिक शहरात दुचाकीचोरीचे सत्र सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 16:07 IST2018-04-15T16:07:23+5:302018-04-15T16:07:23+5:30
नाशिक : शहरात दुचाकी वाहन चोरांचा सुळसुळाट वाढला असून, मुंबई नाका व इंदिरानगर परिसरातून होंडा पॅशन, बुलेट चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे़

नाशिक शहरात दुचाकीचोरीचे सत्र सुरूच
नाशिक : शहरात दुचाकी वाहन चोरांचा सुळसुळाट वाढला असून, मुंबई नाका व इंदिरानगर परिसरातून होंडा पॅशन, बुलेट चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे़
इंदिरानगर परिसरातील ब्ल्युमून सोसायटीमधील रहिवासी श्ोख रिजवान अब्दुल रौफ यांची ८० हजार रुपये किमतीची रॉयन इनफिल्ड क्लासिक बुलेट (एमएच१५, एफजी ०७८५) दुचाकी चोरट्यांनी रविवारी (दि़१४) सायंकाळच्या सुमारास साठेनगर, मेहबूब नगर परिसरातून चोरून नेली. या प्रकरणी शेख यांच्या फिर्यादीवरून इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुचाकी चोरीची दुसरी घटना गोल्फ क्लब ग्राऊंडच्या गेटजवळ शुक्रवारी (दि़१३)रात्रीच्या सुमारास घडली़ जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथील रहिवासी सुनील सखाराम खरे यांनी आपली हिरो होंडा दुचाकी (एमएच १५, बीसी ७२५९) रात्री दहा वाजेच्या सुमारास गोल्फ क्लब मैदानाच्या गेटजवळ उभी केली होती़ चोरट्यांनी ही दुचाकी चोरून नेली़ या प्रकरणी मुंबई नाका पोलिसांनी दुचाकीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
शहरात दिवसेंदिवस वाढत असलेल्या दुचाकी चोऱ्यांच्या घटनांमुळे नागरिक त्रस्त झाले असून या चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जाते आहे़