शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

नाशिकमध्ये सराईत घरफोड्यांकडून २४ लाखांचे सोन्याचे जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2018 8:30 PM

नाशिक : अंबड गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अश्विननगर, राणाप्रताप चौक, गणेश चौक यासह परिसरातील १३ घरफोड्यांची उकल केली असून चौघा संशयितांना अटक केली आहे़ यामध्ये दोन विधी संघर्षित बालकांचा समावेश असून या चौघांकडून १९ लाख रुपये किमतीचे ६५२ ग्रॅम सोने (६५ तोळे) व पाच लाख रुपये किमतीचे टाटा सफारी वाहन जप्त केल्याची माहिती पोलीस आयुक्त डॉ़रविंद्र सिंगल यांनी शुक्रवारी (दि़६) पत्रकार परिषदेत दिली़ विशेष म्हणजे सोशल मीडीया वा मोबाईलचा वापर न करणाऱ्या या सराईतांना केवळ विधीसंघर्षित बालकांकडून मिळालेल्या वर्णनावरून अटक केली़ दरम्यान, या दोघांना न्यायालयाने सोमवारपर्यंत (दि़९) पोलीस कोठडी सुनावली आहे़

ठळक मुद्दे अंबड पोलिसांची कामगिरी : १३ घरफोड्यांची उकलचौघांपैकी दोन संशयित विधीसंघर्षित

नाशिक : अंबड गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अश्विननगर, राणाप्रताप चौक, गणेश चौक यासह परिसरातील १३ घरफोड्यांची उकल केली असून चौघा संशयितांना अटक केली आहे़ यामध्ये दोन विधी संघर्षित बालकांचा समावेश असून या चौघांकडून १९ लाख रुपये किमतीचे ६५२ ग्रॅम सोने (६५ तोळे) व पाच लाख रुपये किमतीचे टाटा सफारी वाहन जप्त केल्याची माहिती पोलीस आयुक्त डॉ़रविंद्र सिंगल यांनी शुक्रवारी (दि़६) पत्रकार परिषदेत दिली़ विशेष म्हणजे सोशल मीडीया वा मोबाईलचा वापर न करणाऱ्या या सराईतांना केवळ विधीसंघर्षित बालकांकडून मिळालेल्या वर्णनावरून अटक केली़ दरम्यान, या दोघांना न्यायालयाने सोमवारपर्यंत (दि़९) पोलीस कोठडी सुनावली आहे़

अंबड पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाच्या अधिका-यांनी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दोन विधीसंघर्षित बालकांना ताब्यात घेतले़ या दोघांची चौकशी केल्यानंतर त्यांनी परिसरात घरफोड्या केल्याची कबुली देऊन चाळीस ग्रॅम सोन्याचे दागिने व नऊ मोबाईल पोलिसांना काढून दिले़ त्यातच परिसरातील बहुतांशी घरफोड्या खिडकीचे गप कापून झाल्याचे समोर आल्याने या दोघांची अधिक चौकशी केल्यानंतर त्यांनी सिडकोतील दत्त चौकातील एक मुलगा खिडकीचे गज कापून घरफोडी करतो अशी माहिती देऊन त्याचे केवळ वर्णन सांगितले़ या संशयितांचा पत्ता व त्याचे नावही माहिती नव्हते़

अंबड पोलिसांनी तीन दिवस हा परिसर पिंजून काढल्यानंतर उपनिरीक्षक चव्हाण यांना मिळालेल्या गोपनीय माहितीतून रात्री बेरात्री एक मुलगा घरी येत असल्याचे समजले. मात्र, तो कुठलाही मोबाईल वा सोशल मीडीयाचा वापर करीत नसल्याने तपास करणे अवघड झाले होते़ मात्र पोलिसांनी विकास पांडुरंग झाडे (१९, व्हीएननाईक शाळेजवळ, दत्ता चौक सिडको) यास ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने साथीदार आकाश विश्वनाथ वानखेडे (रा. सुखदेव नगर, दर्ग्याजवळ,पाथर्डी शिवार इंदिरानगर) सोबत परिसरातील तेरा घरफोड्यांची कबुली दिली़

पोलिसांनी झाडेला अटक केल्यानंतर वानखेडे फरार झाला होता, त्यास त्र्यंबकेश्वरहून ताब्यात घेतल्यानंतर डिसेंबर २०१७ पासून आतापर्यंत १३ घरफोड्यांची कबुली दिली़ पोलीस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सोमनाथ तांबे, पोलीस उपनिरीक्षक तुषार चव्हाण, पोलीस हवालदार भास्कर मल्ले, पोलीस नाईक दत्तात्रय गवारे, दुष्यंत जोपळे, अविनाश देवरे, विजय वरंदळ, चंद्रकांत गवळी, धनंजय दोबाडे, पोलीस शिपाई विपुल गायकवाड, हेमंत अहेर, दीपक वाणी, मनोहर कोळी, नितीन फुलमाळी यांनी ही कामगिरी केली़दागिने पुरले जमिनीतअंबड पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक तुषार चव्हाण यांना मिळालेल्या माहितीवरून दोन विधीसंघर्षित बालकांना ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर त्यांनी घरफोडीची कबुली दिली़ त्यांच्याकडून विविध कंपन्यांचे नऊ मोबाईल तसेच ४० ग्रॅम सोन्याचे दागिने दागिने जप्त करण्यात आले़ विशेष म्हणजे हे दागिने त्यांनी जमिनीमध्ये पुरले होते़टेहळणीनंतर घरफोडीची

सराईत घरफोड्या विकास झाडे व त्याचा साथीदार आकाश वानखेडे हे सर्वप्रथम दिवसा घरांची टेहळणी करायचे़ यासाठी वानखेडेजवळील सफारी वाहनाचा (एमएच ०४, बीएम १९९१) वापर करीत असत़ यानंतर कटवणी व कटरच्या साहाय्याने घराचे गज तोडून त्यातून विधीसंघर्षित बालकांना घरात पाठवून चोरी करीत असत़- सोमनाथ तांबे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, अंबड़

टॅग्स :NashikनाशिकGoldसोनंtheftचोरीPoliceपोलिस