नाशिकमध्ये २५ किलो चांदीच्या भांड्यांची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 18:44 IST2018-02-17T18:40:54+5:302018-02-17T18:44:25+5:30

नाशिकमध्ये २५ किलो चांदीच्या भांड्यांची चोरी
नाशिक : सोसायटीतील फ्लॅटच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी ७ लाख ५० हजार रुपये किमतीची पंचवीस किलो चांदीची भांडी चोरून नेल्याची घटना नाशिक - पुणे रोडवरील दत्तमंदिर चौकाजवळ शुक्रवारी (दि़१६) घडली़
विजय बेदमुथा (रा. रोझ ओटीयन सोसायटी, दादासाहेब फाळके मार्ग, विश्वंभर हॉटेलच्या मागे, दत्तमंदिर चौक, नाशिकरोड)यांनी उपनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार शुक्रवारी सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला़
यानंतर घरातील लाकडी कपाट तोडून त्यातील २५ किलो चांदीची भांडी चोरून नेली़ यामध्ये ८ थाळ्या, २४ वाट्या, १० डिझाईनच्या वाट्या, १८ ग्लास, १२ मोठे चमचे, १२ लहान चमचे, ६ पोह्यांच्या प्लेट्स, एक पानदान, चांदीचे शिक्के व इतर चांदीच्या वस्तूंचा समावेश आहे़
या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़