ठक्कर बाजार बसस्थानकात लॅपटॉपसह नव्वद हजार रुपयांच्या सामानाची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 18:56 IST2018-04-29T18:56:30+5:302018-04-29T18:56:30+5:30
नाशिक : ठक्कर बाजार बसस्थानकामध्ये बसमधून उतरणाऱ्या सोमवार पेठेतील तरुणीचा लॅपटॉपसह नव्वद हजार रुपयांच्या सामानाची बॅग चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शनिवारी (दि़२८) रात्रीच्या सुमारास घडली़

ठक्कर बाजार बसस्थानकात लॅपटॉपसह नव्वद हजार रुपयांच्या सामानाची चोरी
नाशिक : ठक्कर बाजार बसस्थानकामध्ये बसमधून उतरणाऱ्या सोमवार पेठेतील तरुणीचा लॅपटॉपसह नव्वद हजार रुपयांच्या सामानाची बॅग चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शनिवारी (दि़२८) रात्रीच्या सुमारास घडली़
सरकारवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रूईकर वाडा येथील तरुणी तेजश्री वाईकर या शुक्रवारी (दि़२७) सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास शिवशाही (एमएच ०९, ईएम १२९७) या बसमधून नाशिकला निघाल्या़ रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास ही बस ठक्कर बाजार बसस्थानकावर आल्यानंतर खाली उतरत असलेल्या वाईकर यांचा ऐंशी हजार रुपये किमतीचा लॅपटॉप असलेली बॅग चोरट्यांनी बसमधून चोरून नेली़ या बॅगमध्ये लॅपटॉपचा चार्जर, जिवो राऊटर, कपडे, पाच हजार रुपयांची रोकड, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, एटीएम कार्ड, आय कार्ड असा ८९ हजार ५०० रुपयांचा ऐवज होता़
या प्रकरणी वाईकर यांच्या फिर्यादीवरून सरकारवाडा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़