दमननिर्मित पाऊण लाखाचा मद्यसाठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 16:36 IST2017-12-23T16:16:51+5:302017-12-23T16:36:23+5:30
नाशिक : नववर्षाच्या स्वागतासाठी होणाºया मद्याची चोरटी वाहतूक रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्हा सीमावर्ती परिसरातील तपासणी नाक्यांवर कडक तपासणी सुरू केली असून अतिरिक्त भरारी पथकाच्या तीन क्रमांकांच्या युनिटने शनिवारी (दि़२३) सुरगाणा तालुक्यातील पंगरणे शिवारात छापा टाकून सुमारे पाऊण मद्यसाठा जप्त केला़

दमननिर्मित पाऊण लाखाचा मद्यसाठा जप्त
नाशिक : नववर्षाच्या स्वागतासाठी होणाºया मद्याची चोरटी वाहतूक रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्हा सीमावर्ती परिसरातील तपासणी नाक्यांवर कडक तपासणी सुरू केली असून अतिरिक्त भरारी पथकाच्या तीन क्रमांकांच्या युनिटने शनिवारी (दि़२३) सुरगाणा तालुक्यातील पंगरणे शिवारात छापा टाकून सुमारे पाऊण मद्यसाठा जप्त केला़
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उप आयुक्त प्रसाद सुर्वे, अधीक्षक चरणसिंग राजपुत, उपअधीक्षक बारगजे यांनी नाताळ तसेच ३१ डिसेंबरच्या पार्श्वभुमीवर परराज्यातून केली जाणारी चोरटी मद्याची वाहतूक रोखण्यासाठी विशेष योजना आखली आहे़ दिंडोरी येथील भरारी पथक क्रमांक तीनने शनिवारी सुरगाणा तालुक्यातील उंबरठाण - वासदारोड, पंगरेणे शिवारात छापा टाकला़ त्यामध्ये दमण निर्मित जॉन मार्टिन व्हिस्की (१८० मि़ली) ७२० बाटल्या, हायवर्डस ५००० बिअरच्या (५०० मिली) क्षमतेच्या १२० टीन असा एकूण ७१ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे़
निरीक्षक आऱ,एम़धनशेट्टी, दुय्यम निरीक्षक एस़व्ही़देशमुख, जवान महेश सातपुते, लोकेश गायकवाड, संजय सोनवणे, महेश खामकर यांनी ही कारवाई केली़