आशियाई स्पर्धेत संजीवनी रौप्यपदक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 18:55 IST2019-04-24T18:53:58+5:302019-04-24T18:55:17+5:30
नाशिक : दोहा येथे सुरू असलेल्या आशियाई स्पर्धेत दहा हजार मीटर धावण्याच्या स्पर्धेत नाशिकच्या संजीवनी जाधव हिने तिसरा क्रमांक ...

आशियाई स्पर्धेत संजीवनी रौप्यपदक
नाशिक: दोहा येथे सुरू असलेल्या आशियाई स्पर्धेत दहा हजार मीटर धावण्याच्या स्पर्धेत नाशिकच्या संजीवनी जाधव हिने तिसरा क्रमांक मिळवत रौप्यपदक पटकाविले. संजीवनीने ३२:४४:९६ सेकंदाची वेळेची नोंद केली. बहिरीनची धावपटू हिब्ताजेब्रेल शिताई हीने सुवर्ण तर जपानची नियो हितोमी हिने रौप्यपदक मिळविले.
दोहा,कतार येथे सुरू असलेल्या २३ व्या आशियाई स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या संजीवनीने दहा हजार मीटरमध्ये उत्कृष्ठ कामगिरी करीत अपेक्षेप्रमाणे भारतासाठी पदकाची कमाई केली. दोन दिवसांपुर्वी झालेल्या ५००० मीटरमध्ये तीला पहिल्या तीनमध्ये स्थान मिळविता आले नव्हते तीला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. १०००० मीटरमध्ये तीने आपल्या अनुभवाच्या जोरावर दमदार कामगिरी करीत रौप्यपदक मिळविले.
संजीवनीही एकलव्य अॅथलेटिक्स अॅन्ड स्पोर्टस इन्स्टिीट्युट नाशिकची धावपटू असून प्रशिक्षक विजेंद्रसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली तीने सरावावर लक्ष केंद्रीत केले आहे.