नासर्डी नदीतून अनाधिकृत वाळू उपसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 18:39 IST2019-08-28T18:38:56+5:302019-08-28T18:39:49+5:30
इंदिरागर: नुकत्याच झालेल्या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आल्याने अशा ठिकाणी आता पाणी ओसरल्यानंतर अवैध वाळू उपसा होत असल्याचे चित्र ...

नासर्डी नदीतून अनाधिकृत वाळू उपसा
इंदिरागर: नुकत्याच झालेल्या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आल्याने अशा ठिकाणी आता पाणी ओसरल्यानंतर अवैध वाळू उपसा होत असल्याचे चित्र आहे. नासर्डी नदीसह वडाळा गावातील मनपा रुग्णालयामागील नाल्यामधून सध्या वाळू काढली जात आहे.
नदी, नाल्यांना पूर आल्यानंतर सदर पूर आता ओसरला असून नदीतील वाळू काढण्याचे प्रकार वाढले आहेत. काही व्यावसायिकांनी आपल्या कामगारांच्या माध्यमातून वाळू उपसा सुरू केला असून बांधकाम व्यावसायिकांना वाळू विकली जात असल्याची चर्चा आहे.
परिसराती कॉलनी मागील भाग, वडाळा गावातील महापालिकेच्या रु ग्णालयाच्या पाठीमागे, श्रद्धा विहार कॉलनी लगत, तसेच परिसरातील पावसाळी नाल्यातून सर्रासपणे अवैधरित्या वाळू उपसा सुरू आहे . या अनाधिकृत वाळू उपसा करणाऱ्यांना कोणी रोखण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना दम दिला जातो. तातडीने परिसरातील अवैध वाळूचा उपसा थांबवण्याची मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे