भद्रकालीतील लॉजवर सुरू असलेल्या जुगार अड्डयावर पोलिसांचा छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 17:24 IST2018-07-21T17:22:00+5:302018-07-21T17:24:58+5:30
नाशिक : शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने भदक्रालीतील एका लॉजवर छापा टाकून सहा जुगाऱ्यांना अटक केली असून त्यांच्याकडून रोख रकमेसह एक लाख ६३ हजार ६४० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे़ या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात मुंबई जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

भद्रकालीतील लॉजवर सुरू असलेल्या जुगार अड्डयावर पोलिसांचा छापा
नाशिक : शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने भदक्रालीतील एका लॉजवर छापा टाकून सहा जुगाऱ्यांना अटक केली असून त्यांच्याकडून रोख रकमेसह एक लाख ६३ हजार ६४० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे़ या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात मुंबई जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
युनिट एकचे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आनंदा वाघ यांना भद्रकालीतील एका लॉजमध्ये जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली होती़ त्यानुसार बसेरा लॉजच्या ३०८ रुमनंबरमध्ये शुक्रवारी (दि़२०) छापा टाकला असता संशयित बापू (संजय) दौलत देवरे, अण्णा रंगनाथ अहिरे, प्रशांत धुडा परमार, उमेश गोपाल भंडारी, धनंजय बबन टर्ले, उमेश संजीव शेट्टी हे सहा जण ५२ पपनी पत्त्यांच्या कॅटवर पैसे लावून तिरट नावाचा जुगार खेळत होते़
पोलिसांनी या सहा संशयितांकडून जुगाराचे साहित्य व साधनांसह एक लाख १४ हजार ६४० रुपये रोख, व ४९ हजार रुपयांचे मोबाईल असा एक लाख ६३ हजार ६४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला़ पोलीस उपनिरीक्षक पालकर, सहायक पोलीस उपनिरीक्षक जाकिर शेख, पोपट कारवाळ, पोलीस हवालदार संजय मुळक, वसंत पांडव, पोलीस नाईक आसिफ तांबोळी, संतोष कोरडे, सूर्यवंशी यांनी ही कारवाई केली़