नोकरीसाठी आलेल्या नंदुरबारच्या तरुणीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 23:01 IST2018-03-25T23:01:36+5:302018-03-25T23:01:36+5:30

नाशिक : नोकरीसाठी नाशिकमध्ये आलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील तरुणीच्या अज्ञानपणाचा फायदा घेत विवाहाचे आमिष दाखवून निफाड तालुक्यातील संशयिताने शारीरिक अत्याचार केल्याची फिर्याद पीडित तरुणीने मुंबई नाका पोलीस ठाण्यात दिली आहे़ विशेष म्हणजे या संशयिताने आपला विवाह झाल्याचे तरुणीपासून लपवून ठेवत सुमारे दोन वर्षे या तरुणीवर अत्याचार करीत होता़

nashik,nandurbar,girl,rape,crime,registered | नोकरीसाठी आलेल्या नंदुरबारच्या तरुणीवर अत्याचार

नोकरीसाठी आलेल्या नंदुरबारच्या तरुणीवर अत्याचार

ठळक मुद्दे तरुणीच्या अज्ञानपणाचा फायदामुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा

नाशिक : नोकरीसाठी नाशिकमध्ये आलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील तरुणीच्या अज्ञानपणाचा फायदा घेत विवाहाचे आमिष दाखवून निफाड तालुक्यातील संशयिताने शारीरिक अत्याचार केल्याची फिर्याद पीडित तरुणीने मुंबई नाका पोलीस ठाण्यात दिली आहे़ विशेष म्हणजे या संशयिताने आपला विवाह झाल्याचे तरुणीपासून लपवून ठेवत सुमारे दोन वर्षे या तरुणीवर अत्याचार करीत होता़

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित तरुणी ही नंदुरबार जिल्ह्यातील असून, रोजगारासाठी २०१५ मध्ये नाशिकमध्ये आली होती़ कॉलेजरोड परिसरात राहत असताना संशयित महेश बबनराव पवार (राख़ेरवाडी, ता़निफाड, जि़नाशिक) याने या तरुणीच्या अज्ञानपणाचा फायदा घेऊन तिच्यासोबत ओळख वाढविली़ यानंतर स्वत:चे पहिले लग्न झाल्याचे लपवून ठेवत या तरुणीचा विवाहाचे आमिष दाखवून मुंबई नाका परिसरातील एका हॉस्पिटलचा स्टाफ रूम तसेच एका अपार्टमेंटमध्ये रूम भाड्याने घेऊन तिच्यावर शारीरिक अत्याचार केला़

याप्रकरणी पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार मुंबई नाका पोलीस ठाण्यात संशयित महेश पवार (रा. खेरवाडी. ता. निफाड) विरोधात बलात्कार तसेच अनुसूचित जाती जमाती कायदा अत्याचार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: nashik,nandurbar,girl,rape,crime,registered