नाशिकमध्ये घरफोडीत अडीच लाखांचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 17:19 IST2018-02-20T17:19:06+5:302018-02-20T17:19:55+5:30
नाशिक : बनावट चावीने दरवाजाचे कुलूप उघडून घरातील सोन्या-चांदीच्या दागिण्यांसह सुमारे अडीच लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना खोडेनगरमध्ये घडली़ या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

नाशिकमध्ये घरफोडीत अडीच लाखांचा ऐवज लंपास
नाशिक : बनावट चावीने दरवाजाचे कुलूप उघडून घरातील सोन्या-चांदीच्या दागिण्यांसह सुमारे अडीच लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना खोडेनगरमध्ये घडली़ या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
मुंबई नाका पोलीस ठाण्यात राजू सगीर कादरी (३२ रा.ताबीर इनक्लेव्ह बिल्डींग,अनुसया कॉलनी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शनिवारी (दि़१७) ते कुटुंबियांसह बाहेरगावी गेले होते़ या कालावधीत चोरट्यांनी कादरी यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप बनावट चावीने उघडून घरात प्रवेश केला़ यानंतर बेडरुममधील कपाटात ठेवलेले दोन लाख रुपयांचे आठ तोळ्यांचे सोन्याचे व चांदीचे दागिने (हार, हातकडे, पेंडल व चेन) व रोख साठी हजार रुपयांची रोकड असा २ लाख ६० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला़
कादरी हे रविवारी (दि़१८) बाहेरगावहून परतल्यानंतर घरफोडीचा प्रकार उघडकीस आला़ कादरी यांनी तत्काळ मुंबई नाका पोलीस ठाण्यात धाव घेऊन घटनेची माहिती दिली़