शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाटच्या बांबू राख्यांना नाशिककरांची पसंती

By admin | Updated: September 4, 2016 00:47 IST

तिसरे वर्ष : विद्यार्थ्यांचा ‘प्रोजेक्ट बंधन

 

’नाशिक : मेळघाटमधील दुर्गम आदिवासींच्या हातांना अधिकाधिक रोजगार मिळावा, यासाठी गेल्या तीन वर्षांपासून मविप्रचे एमबीएचे विद्यार्थी परिश्रम घेत आहेत. संपूर्ण बांबू केंद्रात आदिवासींनी बनविलेल्या राख्यांची नाशिकच्या बाजारपेठेत विक्री करत सुमारे दोन लाख रुपयांचे उत्पन्न या केंद्राला विद्यार्थ्यांनी यावर्षी मिळवून दिले.ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या एमबीएच्या विद्यार्थ्यांनी यावर्षीही बांबूंच्या पर्यावरणूपरक राख्या नाशिकच्या बाजारपेठेत विकल्या. एमबीए विभागाचे विभागप्रमुख डी. टी. खैरनार, डॉ. एस. आर. पाचोरकर यांनी ‘प्रोजेक्ट बंधन’ हातात घेतले आहे. संस्थेचे तिसरे वर्ष असून, यावर्षी विद्यार्थ्यांनी शहरातील मेनरोड, गंगाघाट, सोमेश्वर मंदिर, कपालेश्वर मंदिर, बालाजी मंदिर, एमजीरोड, सिटी सेंटर मॉल, दहीपूल आदि परिसरात स्टॉल्स लावून बांबूपासून तयार करण्यात आलेल्या राख्यांच्या विक्रीचा ‘सोशल टास्क’ पूर्ण केला. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, संवाद कौशल्य, विपणनशास्त्र आदि बाबींचा विकास व्हावा आणि आदिवासींच्या हस्तकलेला अधिकाधिक चालना मिळावी, या उदात्त हेतूने प्रोजेक्ट बंधन राबविले जात आहे, अशी माहिती खैरनार यांनी यावेळी दिली. वेणू शिल्पी औद्योगिक संस्थेच्या संपूर्ण बांबू केंद्राच्या अध्यक्ष निरुपमा देशपांडे यांना एमबीएच्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत दोन लाख दोन हजार ४०२ रुपयांचा धनादेश संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तीन वर्षांमध्ये एकूण ४ लाख ७८ हजार रुपयांचे उत्पन्न विद्यार्थ्यांनी या उपक्रमातून आदिवासींना मिळवून दिले आहे.अनियमित रोजगारामुळे सातपुडा पर्वतरांगेचे अखेरचे टोक असलेले मेळघाट कुपोषित बालमृत्यूसाठी ओळखले जाते. मेळघाटची ही ओळख बदलण्यासाठी आदिवासींना कुशल कारागीर बनविण्याचा प्रयत्न २१ वर्षांपासून वेणू शिल्पी संस्था करत आहे. दहावी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना किराणा मालाची यादीही लिहिता येणार नाही, इतक्या सुमार दर्जाचे शिक्षण आदिवासींना दिले जाते. नाशिकपासून सुरू झालेले ‘प्रोजेक्ट बंधन’ राज्यभर पोहचले याचा अभिमान असल्याचे देशपांडे यांनी यावेळी सांगितले. (प्रतिनिधी)