नाशिककरांनी लुटली श्रावणसरींची मौज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 14:12 IST2019-08-04T14:08:47+5:302019-08-04T14:12:27+5:30
यंदाच्या पावसाळ्याच्या सुरुवातीला जूनमध्ये ओढ देणारा पाउस जुलैमध्ये समाधानकारक कोसळल्यानंतर ऑगस्टच्या सुरुवातीपासूनत धुव्वाधार बरसत आहे. गेल्या आठवडयापासून सुरु असलेल्या पावसाने शुक्रवारी मध्यरात्रीपासून जोर धरला असून शनिवारी दिवसभर शहरात पाऊस कोसळयानंतर रविवारही पाऊस सुरु असल्याने नाशिककरांना सकाळपासूनच पावसात चिंब होण्याचा आनंद लुटला.

नाशिककरांनी लुटली श्रावणसरींची मौज
नाशिक : यंदाच्या पावसाळ्याच्या सुरुवातीला जूनमध्ये ओढ देणारा पाउस जुलैमध्ये समाधानकारक कोसळल्यानंतर ऑगस्टच्या सुरुवातीपासूनत धुव्वाधार बरसत आहे. गेल्या आठवडयापासून सुरु असलेल्या पावसाने शुक्रवारी मध्यरात्रीपासून जोर धरला असून शनिवारी दिवसभर शहरात पाऊस कोसळयानंतर रविवारही पाऊस सुरु असल्याने नाशिककरांना सकाळपासूनच पावसात चिंब होण्याचा आनंद लुटला.
शहरातील विविध परिसरातील सखल भागात पाणीसाचल्याने नाशिककरांनी रस्त्यावर येऊन पावसात भिजण्याची आनंद घेतला.कॉलेजरोड, गंगापूर रोड, आसारामबापू पूल, मखमलाबाद रोड, अशोकामार्ग, रविशंकर मार्ग पाखाल रोड, वडाला पाथर्डी रोड, तपोवन रोड या सह त्रीमूर्ती चौक,उपनगर या भागात नागरिकांना रस्त्यावर येऊन पावसात चिंब भिजण्याचा आनंद लूटला. रस्त्यावरील पाण्याचा अंदाज पाहून नागरिकांना आपल्यासोबत लहानग्या मुलांनाही पावसात चिंब होऊ मौज लुटण्याची संधी उपलब्ध करून दिली. अनेकजणांनी रविवाकच्या सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी जवळच्या पर्यटनस्थळांवर जाण्याचा बेत आखला होता. परंतु पावसामुळे त्यांच्या नियोजनावर पाणी फिरल्याने ज्याठिकाणी वाहने अडकली त्याच ठिकाणी पावसात भिजण्याचा आनंद घेतला.
वाफाळलेला चहा आणि कांदभज्जीवंर ताव
नाशिककरांना गेल्या अनेक दिवसापासून प्रतीक्षा असेल्या मुसळधार पावसाने अखेर श्रावणात नाशिकरांना चिंब केले. या पावसाचे शहरवासीयांनीही उत्साहात स्वागत केले असून पावसामुळे थंडगार झालेल्या वातावरणात वाफाळणारा चहा आणि गमागरम भज्जीचा आस्वाद घेण्यासाठीही पाणी न साजणाऱ्या भागातील ठिकठिकाणच्या स्टॉलवर नािगरिकांनी गर्दी केल्याचे दिसून आले.