प्रियकराने विवाहास नकार दिल्याने नाशिकमध्ये नर्सची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2018 15:19 IST2018-03-02T15:19:42+5:302018-03-02T15:19:42+5:30
नाशिक : प्रियकराने विवाहास नकार दिल्याने मुंबई-आग्रा महामार्गावरील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये काम करणा-या परप्रांतीय नर्सने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (दि़१) रात्रीच्या सुमारास आडगाव परिसरात घडली़ अश्विनी के.के़ (२५, रा. अपोले हॉस्पिटल, नर्सिंग होस्टेल, रूम नंबर 4, पहिला मजला, नाशिक़ मूळ राक़ेरळ) असे आत्महत्या केलेल्या नर्सचे नाव आहे़

प्रियकराने विवाहास नकार दिल्याने नाशिकमध्ये नर्सची आत्महत्या
नाशिक : प्रियकराने विवाहास नकार दिल्याने मुंबई-आग्रा महामार्गावरील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये काम करणा-या परप्रांतीय नर्सने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (दि़१) रात्रीच्या सुमारास आडगाव परिसरात घडली़ अश्विनी के.के़ (२५, रा. अपोले हॉस्पिटल, नर्सिंग होस्टेल, रूम नंबर 4, पहिला मजला, नाशिक़ मूळ राक़ेरळ) असे आत्महत्या केलेल्या नर्सचे नाव आहे़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नर्स अश्विनी केक़े़हिचे गत काही महिन्यांपासून एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते़ या दोघांनीही विवाह करण्याचा निर्णय घेतला होता़ मात्र, अचानक प्रियकराने विवाहास नकार दिल्याने ती तणावात होती़ गुरुवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास अश्विनी के. या नर्सने हॉस्टेलच्या रुममध्ये नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली़
दरम्यान, या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़