तिस-या डोळ्यामुळे सापडला हॉस्पिटलमधील चोर...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 18:58 IST2018-01-09T18:57:46+5:302018-01-09T18:58:34+5:30
नाशिक : खासगी हॉस्पिटलमधील कॅशियरच्या कॅबिनमध्ये घुसून तब्बल एक लाखाची रोकड चोरणारा संशयित तिसरा डोळा अर्थात सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात संशयित विदीत जोशी (वय २९, रा़ गोरेवाडी, जेलरोड) याच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

तिस-या डोळ्यामुळे सापडला हॉस्पिटलमधील चोर...
नाशिक : खासगी हॉस्पिटलमधील कॅशियरच्या कॅबिनमध्ये घुसून तब्बल एक लाखाची रोकड चोरणारा संशयित तिसरा डोळा अर्थात सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात संशयित विदीत जोशी (वय २९, रा़ गोरेवाडी, जेलरोड) याच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
हिरावाडी परिसरातील शिवरामनगरमधील रहिवासी कांचन गवळी यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार त्या सुश्रूत हॉस्पिटलमध्ये कामास आहेत़ या हॉस्पिटलमध्ये आॅक्टोबर महिन्यात रुजू झालेला संशयित विदीत जोशी हा १५ डिसेंबर २०१७ रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास हॉस्पिटलच्या अकाउंटंट अश्विनी राऊत या कामात व्यस्त असताना त्यांच्या कॅबिनमध्ये आला़
यानंतर त्याने या कार्यालयातील ड्रॉवरमध्ये असलेली एक लाख रुपयांची रोकड चोरून नेली़ विशेष म्हणजे हा सर्व प्रकार हॉस्पिटलच्या सीसीटीव्हीत कैद झाला व जोशीची चोरी पकडली गेली़ या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़