नाशिकच्या हिरावाडीत टोळक्याकडून तरुणांची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 16:57 IST2018-01-10T16:54:52+5:302018-01-10T16:57:44+5:30

नाशिक : हिरावाडी परिसरातील एनआयटी महाविद्यालयाच्या मागील बाजूस फिरण्यासाठी गेलेल्या तरुणांचे मोबाईल व रोख रक्कम वाघाडीतील चौघा संशयितांनी लूटून नेल्याची घटना शनिवारी (दि़६) घडली आहे़

nashik,hirawaxi,Youth,robbery | नाशिकच्या हिरावाडीत टोळक्याकडून तरुणांची लूट

नाशिकच्या हिरावाडीत टोळक्याकडून तरुणांची लूट

ठळक मुद्दे३७ हजार ६०० रुपयांचा ऐवज लुट पंचवटी पोलीसात गुन्हा दाखल

नाशिक : हिरावाडी परिसरातील एनआयटी महाविद्यालयाच्या मागील बाजूस फिरण्यासाठी गेलेल्या तरुणांचे मोबाईल व रोख रक्कम वाघाडीतील चौघा संशयितांनी लूटून नेल्याची घटना शनिवारी (दि़६) घडली आहे़
वैभव पांडुरंग घोडे (रा. चेहेडी पंपिंग, नाशिकरोड) या युवकाने दिलेल्या फियार्दीनुसार हिरावाडीतील एनआयटी कॉलेजमधील मित्रांना भेटण्यासाठी आपल्या चौघा मित्रांसमवेत शनिवारी गेला होता. दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास वैभव घोडे व त्याचे मित्र अमोल घुगे, आकाश भोये, शुभम आंबेकर व रवी या मित्रांसमवेत महाविद्यालयाच्या पाठीमागे फिरण्यासाठी जात असताना संशयित मोहन सुभाष निसाळ (२०, रा. वाघाडी, पंचवटी) व त्याचे तीन साथीदार यांनी त्यांना अडविले़ यानंतर घोडे व मित्रांच्या खिशातील मोबाईल व रोख रक्कम असा ३७ हजार ६०० रुपयांचा ऐवज संशयितांनी बळजबरीने लुटून फरार झाले़ त्यामध्ये अमोल घुगे याच्या खिशातील पंधरा हजार रुपये किमतीचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल, पाच हजार रुपये किमतीचा एक मोबाईल, आकाश भोये याच्या खिशातील पाच हजार रुपये किमतीचा मोबाईल, शुभम आंबेकर याच्या खिशातील आठ हजार रुपयांचा मोबाईल व चार हजार६०० रुपयांची रोकडचा समावेश आहे़
या प्रकरणी पंचवटी पोलीसात संशयित निसाळ व त्याच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: nashik,hirawaxi,Youth,robbery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.