शहरं
Join us  
Trending Stories
1
"वायफळ बडबड करू नका..."; राऊतांचा दावा काँग्रेसनेच खोडला, ठाकरे गटालाही फटकारलं
2
संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शाहांचा प्रयत्न
3
“जीवापेक्षा मोठे काही नाही, शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये, सरकारने...”: मनोज जरांगे पाटील
4
शरद पवारांना दुहेरी धक्का; २ अत्यंत विश्वासू शिलेदार पक्षाची साथ सोडणार?
5
“सहाव्या टप्प्यात इंडिया आघाडीने २७२ जागांचा आकडा गाठला, भाजपाचा पराभव निश्चित”: काँग्रेस
6
१ जूनपासून गॅस सिलेंडर ते बँकिंगचे नियम बदलणार; थेट तुमच्या खिशावर परिणाम होणार
7
Cyclone Remal: 'रेमल' चक्रीवादळ आज बंगालमध्ये धडकणार, एनडीआरएफचे पथक सतर्क; महाराष्ट्रावर परिणाम होणार?
8
“पंतप्रधान मोदींची भाषा अन् भाजपाच्या जागा दोन्ही सातत्याने घसरत चालल्या आहेत”: राहुल गांधी
9
“PM मोदींची १०० वेळा जगभ्रमंती, उद्धव ठाकरे परदेशात गेले तर पोटात का दुखते”; राऊतांची टीका
10
दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
11
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
12
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींवर बाप्पाची कृपा, शासकीय कामात लाभ; पदोन्नती योग; व्यापारवृद्धी!
13
"नशिबाने माझ्या नावाचा कोणी सुलतान नव्हता, नाहीतर...", नावावरून ट्रोल करणाऱ्यांना आस्ताद काळेने सुनावलं
14
येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी
15
Hardik-Natasa Divorce : हार्दिक पांड्याबरोबरच्या घटस्फोटाच्या चर्चांवर नताशाने दोन शब्दात दिलं उत्तर, म्हणाली...
16
अजित पवार यांच्या रडारवर येणार तरी कोण? चर्चेला उधाण; निकालाची उत्सुकता शिगेला
17
लोकसभेनंतर विधानपरिषदेतही उद्धवसेनेची उमेदवारीची घाई; मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब!
18
वेळ बदलली, त्यामुळे चेहरा बदलला आहे...; भुजबळ समर्थकांच्या रील्समुळे पुन्हा चर्चेला उधाण
19
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
20
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल

मनोरंजनातून अ‍ॅनिमिया जनजागृतीसाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 6:26 PM

नाशिक : अ‍ॅनिमिया या आजाराविषयी लोकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी मनोरंजनाच्या माध्यमातून गोवर्धन येथे जनजागृती शिबीर घेण्यात आले. यामध्ये महिलांना ...

ठळक मुद्देजल्हा परिषद: आरोग्य विभागाकडून विविध उपक्रम

नाशिक: अ‍ॅनिमिया या आजाराविषयी लोकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी मनोरंजनाच्या माध्यमातून गोवर्धन येथे जनजागृती शिबीर घेण्यात आले. यामध्ये महिलांना या आजाराविषयी सप्रयोग मार्गदर्शन करण्यात आले.गोवर्धन आरोग्य उपकेंद्र, कुटूंबकल्याण केंद्र तसेच प्रशिक्षण केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने अ‍ॅनिमिया जनाजगृती मोहिम राबविली जात आहे. अ‍ॅनिमिया मुक्त भारत कार्यक्र मा अंतर्गत या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्र माचे उद्घाटन डॉक्टर पट्टणशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दावल साळवे तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ. भालेराव डॉ. किरण बकरे, संख्याकी अधिकारी सूर्यवंशी, श्रीमती अर्चना जोशी , प्रशांत केळकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.याउपक्रमांतर्गत लाभार्थींना हस्त पत्रिका वाटून माहिती देणे , पोस्टर प्रदर्शन ,सापशिडी खेळाच्या माध्यमातून प्रश्नमंजुषा चित्र माहितीच्या आधारे अ‍ॅनिमिया विषयी माहिती देणे , लोककलेचे माध्यम भारूड सादर करून जनजागृती करण्यात आली. याप्रसंगी आहाराचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. उपस्थितांना अ‍ॅनिमिया या आजाराविषयी माहिती देऊन वेगवेगळ्या माध्यमांचा वापर करून जनजागृती करण्यात आली.सह संचालक डॉ पट्टणशेट्टी यांनी या कार्यक्र माचे महत्त्व विशद केले व अ‍ॅनिमिया विषयी माहिती घेऊन लोकांनी आपल्या आहारामध्ये विहारांमध्ये बदल करावा, किशोरवयीन मुलांनी आपल्या आहाराकडे लक्ष द्यावे गरोदर मातांनी आपल्या आहाराकडे लक्ष द्यावे व आपला आहार चौरंगी कसा होईल व आपल्या बाळाची वाढ चांगल्या प्रकारे साधावयाचा असेल तर अशा प्रकारच्या कार्यक्र माची नितांत गरज असते असे सांगितले. पुढील दोन दिवस गोवर्धन येथील समाज मंदिर व जलालपूर येथील समाज मंदिरामध्ये कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्र मासाठी आशा गटप्रवर्तक आरोग्यसेविका सेवक आरोग्य सहाय्यक सहाय्यक यांनी विशेष प्रयत्न केले.

टॅग्स :NashikनाशिकHealthआरोग्य