पाचव्या मजल्यावरून मुलगी अंगावर पडल्याने वडीलांचा जागीच मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 16:02 IST2018-04-27T16:00:34+5:302018-04-27T16:02:10+5:30
नाशिक : पाचव्या मजल्यावरून चुलतबहिणीचा हळदीचा कार्यक्रम पाहत असताना अचानक तोल जावून सोळा वर्षीय मुलगी वडीलांच्या अंगावर पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि़२६) मध्यरात्रीच्या सुमारास सामनगावरोड परिसरातील अश्विनी कॉलनीतील जयप्रकाशनगरमध्ये घडली़ विजय किसन गोधडे(३८) असे मृत्यू झालेल्या वडीलांचे नाव असून गंभीर जखमी झालेल्या सुनंदा गोधडे या मुलीवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत़

पाचव्या मजल्यावरून मुलगी अंगावर पडल्याने वडीलांचा जागीच मृत्यू
नाशिक : पाचव्या मजल्यावरून चुलतबहिणीचा हळदीचा कार्यक्रम पाहत असताना अचानक तोल जावून सोळा वर्षीय मुलगी वडीलांच्या अंगावर पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि़२६) मध्यरात्रीच्या सुमारास सामनगावरोड परिसरातील अश्विनी कॉलनीतील जयप्रकाशनगरमध्ये घडली़ विजय किसन गोधडे(३८) असे मृत्यू झालेल्या वडीलांचे नाव असून गंभीर जखमी झालेल्या सुनंदा गोधडे या मुलीवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत़
नाशिकरोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सामनगाव रोड परिसरातील अश्विनी कॉलनी जयप्रकाशनगरमधील रहिवासी विजय गोधडे यांच्या पुतणीचा गुरुवारी हळद होती़ रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास गोधडे यांची सोळा वर्षीय मुलगी सुनंदा ही इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून हळदीचा कार्यक्रम पाहत होती़ हा कार्यक्रम पाहत असताना तिचा अचानक तोल गेला व आरडाओरड सुरू असताना खाली उभे असलेले विजय गोधडे हे मुलीला वाचविण्यासाठी धावले असता सुनंदा त्यांच्या अंगावर पडली़ यामध्ये विजय गोधडे व त्यांची मुलगी सुनंदा हे दोघेही गंभीर जखमी झाले़ या दोघांनाही उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी विजय गोधडे यांना मयत घोषीत केले तर सुनंदा हिच्यावर उपचार सुरू आहेत़
विजय गोधडे यांच्या पश्चात दोन मुली, दोन मुले असा परिवार असून या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे़ दरम्यान, विजय गोधडे यांच्यावर शुक्रवारी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले़