रस्ता दुभाजकावरून पडलेल्या इसमाचा बसखाली सापडल्याने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 07:50 PM2018-02-12T19:50:27+5:302018-02-12T19:54:01+5:30

नाशिक : म्हसरूळ-दिंडोरी रोडवरील स्टेट बँक आॅफ इंडियासमोरील रस्ता दुभाजकावरून उतरत असताना पाय सटकल्याने रस्त्यावर पडलेला इसम परिवहन महामंडळाच्या बसखाली सापडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि़१२) दुपारच्या सुमारास घडली़ राजेंद्र विठ्ठल सूर्यवंशी (५०, रा़ एकतानगर, बोरगड, म्हसरूळ) असे अपघातात मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे़

nashik,dindori,road,bus,accident,one,death | रस्ता दुभाजकावरून पडलेल्या इसमाचा बसखाली सापडल्याने मृत्यू

रस्ता दुभाजकावरून पडलेल्या इसमाचा बसखाली सापडल्याने मृत्यू

Next
ठळक मुद्देरस्ता दुभाजकावरून उतरत असताना पाय सटकल्याने रस्त्यावर म्हसरूळ पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल

नाशिक : म्हसरूळ-दिंडोरी रोडवरील स्टेट बँक आॅफ इंडियासमोरील रस्ता दुभाजकावरून उतरत असताना पाय सटकल्याने रस्त्यावर पडलेला इसम परिवहन महामंडळाच्या बसखाली सापडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि़१२) दुपारच्या सुमारास घडली़ राजेंद्र विठ्ठल सूर्यवंशी (५०, रा़ एकतानगर, बोरगड, म्हसरूळ) असे अपघातात मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे़

म्हसरूळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बोरगड येथील एकतानगरमधील रहिवासी राजेंद्र सूर्यवंशी हे सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास कामानिमित्त दिंडोरीरोडवरील स्टेट बँक आॅफ इंडियाजवळील दुकानात गेले होते़ काम आटोपून रस्ता ओलांडण्यासाठी ते रस्ता दुभाजकावर चढले व खाली उतरत असताना त्यांचा पाय सटकला व ते रस्त्यावर पडले़ नेमकी याचवेळी नाशिककडे येणाºया राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक-कळवण (एमएच ४० एन ८८०२) बसखाली ते सापडले़ बसचे चाक त्यांच्या डोक्यावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला़

सूर्यवंशी हे अचानक बसखाली आल्याने बसचालकाने बस थांबविण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत डोक्यावरून बसचे चाक गेल्याने सूर्यवंशी यांचा मृत्यू झालेला होता़ या अपघातानंतर नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती़ दरम्यान, घटनेची माहिती मिळताच म्हसरूळ पोलीस ठाण्याचे कर्मचारी हजर झाले होते़ सूर्यवंशी हे पेंटर असून त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुलगी असा परिवार आहे़

याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: nashik,dindori,road,bus,accident,one,death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.