नाशिकमध्ये घरफोडी सत्र : तीन घरफोड्यांमध्ये दोन लाखांचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 13:15 IST2018-04-09T13:15:33+5:302018-04-09T13:15:33+5:30

नाशिक : उन्हाळ्याच्या सुटीत बाहेरगावी जाणाऱ्या नागरिकांच्या घरांवर डोळा ठेवून घरफोडी करणारे चोरटे सुट्यांपुर्वीच सक्रिय झाले आहेत़ शहरातील उपनगर, अंबड व नाशिकरोड या विविध परिसरातील तीन ठिकाणी घरफोडी करून चोरट्यांनी सुमारे दोन लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे़

nashik,city,three,house,burglary,Two,lakh,gold,theft | नाशिकमध्ये घरफोडी सत्र : तीन घरफोड्यांमध्ये दोन लाखांचा ऐवज लंपास

नाशिकमध्ये घरफोडी सत्र : तीन घरफोड्यांमध्ये दोन लाखांचा ऐवज लंपास

ठळक मुद्देउन्हाळ्याच्या सुटीपुर्वीच चोरटे सक्रियपेट्रोलिंग वाढवून घरफोड्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी

नाशिक : उन्हाळ्याच्या सुटीत बाहेरगावी जाणाऱ्या नागरिकांच्या घरांवर डोळा ठेवून घरफोडी करणारे चोरटे सुट्यांपुर्वीच सक्रिय झाले आहेत़ शहरातील उपनगर, अंबड व नाशिकरोड या विविध परिसरातील तीन ठिकाणी घरफोडी करून चोरट्यांनी सुमारे दोन लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे़ सोन्याचे दागिणे, रोख रक्कम व हॉस्पिटलमधील अ‍ॅटो रिफॅक्टोमीटरही चोरट्यांनी चोरून नेले आहेत़ उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पेट्रोलिंग वाढवून पोलिसांनी घरफोड्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे़

गणेश चंद्रकात डबे (४०, श्री गणेश बंगला, हरीओमनगर, आर्टिलरी सेंटर रोड, नाशिकरोड) यांनी उपनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार ६ एप्रिल ते ८ एप्रिल या कालावधीत ते कुटुंबासह बाहेरगावी गेले होते़ या कालावधीत चोरट्यांनी त्यांच्या बंगल्याच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला़ तसेच घराच्या बेडरुममधील लाकडी कपाटातून ४५ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले़ चोरून नेलेल्या दागिण्यांमध्ये ५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दोन नाणे, पंधरा ग्रॅम वजनाची चांदीची तोरडी, २५ ग्रॅम वजनाचे चांदीचे नाणी,पाच ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, पाच गॅ्रम वजनाचे सोन्याचे टॉप्स व १६ हजार रुपयांच्या रोख रकमेचा समावेश आहे़ या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

दुसरी घटना सिडकोतील शिवपुरी चौकात घडली़ प्रकाश बागूल (शिवपूरी चौक, अतुल डेअरीच्या मागे, उत्तमनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसारशनिवारी (दि़७) मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी त्यांचा तसेच त्यांच्या घराशेजारी राहणारे संदीप आहेर यांच्या घराच्या दरवाजाचा लोखंडी कडी-कोयंडा कापून घरात प्रवेश केला़ तसेच घरातून सोन्याचे मंगळसूत्र, दोन सोन्याच्या अंगठ्या, एलसीडी टीव्ही, मोबाईल व बारा हजार रुपयांची रोकड असा ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला़ या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

तिसरी घटना बिटको परिसरातील घडली असून चोरट्यांनी चक्क हॉस्पिटलमधून महागडे अ‍ॅटो रिफॅक्टोमीटर चोरून नेले आहे़ युवराज भांगरे (गुरुवैभव अपार्टमेंट, गुलमोहर कॉलनी,आनंदनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शनिवारी (दि़७) रात्री ९़३० ते रविवारी (दि़८) सायंकाळी पाच वाजेच्या कालावधीत चोरट्यांनी त्यांच्या बिटको चौकातील डॉ़ भांगरे रुग्णालयाच्यादरवाजाच्या लॅचचे कुलूप तोडून रुग्णालयात प्रवेश केला़ तसेच रुग्णालयातील डोळ्यांची तपासणी करण्यासाठी लागणारे ९० हजार रुपये किमतीचे अ‍ॅटो रिफॅक्टो मीटर चोरून नेले़ या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Web Title: nashik,city,three,house,burglary,Two,lakh,gold,theft