सिडकोत कुरापत काढून एकावर चॉपरने वार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 17:23 IST2018-08-13T17:22:55+5:302018-08-13T17:23:25+5:30
नाशिक : आॅफिसमधून बाहेर काढल्याच्या रागातून तिघा संशयितांनी एकास बेदम मारहाण करून चॉपरने वार केल्याची घटना सिडकोतील शुभमपार्कजवळ घडली़

सिडकोत कुरापत काढून एकावर चॉपरने वार
नाशिक : आॅफिसमधून बाहेर काढल्याच्या रागातून तिघा संशयितांनी एकास बेदम मारहाण करून चॉपरने वार केल्याची घटना सिडकोतील शुभमपार्कजवळ घडली़
सिडकोच्या गजानननगरच्या ऋग्वेद अपार्टमेंटमधील रहिवासी राहुल ऊर्फ हेमंत कैलास सूर्यवंशी (३०) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शुक्रवारी (दि़१०) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास संशयित सुनील पुंडलिक ढोली (२६ रा. शुभम पार्क, सिडको), सागर प्रकाश शेलार (२१, रा. पवननगर, सिडको) व कल्पेश विजय देवगावकर (२१, रा. सावतानगर, सिडको, नाशिक) यांनी अडविले़ यानंतर देवगावकर यास आॅफिसमधून काढले, अशी विचारणा करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली़ यानंतर संशयितांनी सूर्यवंशी याच्या डोके व हातावर चॉपरने वार करून जखमी केले.
शिवसेनेचे नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी यांचा हेमंत सूर्यवंशी हा पुतण्या असून, त्यास उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान, या प्रकरणी अंबड पोलिसांनी तिघा संशयितांवर गुन्हा दाखल केला आहे़