सिडकोत आठवीच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 17:15 IST2018-08-06T17:14:25+5:302018-08-06T17:15:06+5:30
नाशिक : आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सिडकोतील सिंहस्थनगरमध्ये रविवारी (दि़५)घडली़ सचिन प्रमोद मोरे (१४,रा. तुळजाभवानी चौक, सिडको) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे़

सिडकोत आठवीच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या
नाशिक : आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सिडकोतील सिंहस्थनगरमध्ये रविवारी (दि़५)घडली़ सचिन प्रमोद मोरे (१४,रा. तुळजाभवानी चौक, सिडको) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सचिन हा आठवीच्या वर्गात शिक्षण घेत होता़ सचिन याने रविवारी (दि. ५) घरातील फॅनच्या हुकला नायलॉनच्या दोरीने साहाय्याने गळफास घेतला़ त्यास कुटुंबीयांनी प्रथम खासगी रुग्णालयात त्यानंतर जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल पाटील यांनी त्याला तपासून मृत घोषित केले.
एकूलत्या एक असलेल्या सचिन याने आत्महत्या का केली याचे कारण समजू शकले नसून याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़