नाशिकरोड कारागृहात कैद्याचा आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 17:25 IST2018-02-22T17:20:03+5:302018-02-22T17:25:13+5:30

नाशिक : नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्याने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना बुधवारी (दि़२१) रात्रीच्या सुमारास घडली़ सोमनाथ दगडू शेडे असे आत्महत्येचा प्रयत्न करणा-या कैद्याचे नाव आहे. या प्रकरणी शेडेविरोधात नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

 nashik,central,jail,prisoner,attempt,suicide | नाशिकरोड कारागृहात कैद्याचा आत्महत्येचा प्रयत्न

नाशिकरोड कारागृहात कैद्याचा आत्महत्येचा प्रयत्न

ठळक मुद्दे नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह ; बुधवारी रात्रीची घटनापॅन्टच्या नाडीने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न

नाशिक : नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्याने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना बुधवारी (दि़२१) रात्रीच्या सुमारास घडली़ सोमनाथ दगडू शेडे असे आत्महत्येचा प्रयत्न करणा-या कैद्याचे नाव आहे. या प्रकरणी शेडेविरोधात नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

नाशिकरोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात सोमनाथ दगडू शेडे हा शिक्षाबंदी आहे़ बुधवारी रात्री पावणेआठ वाजेच्या सुमारास कारागृहातील मंडल क्रमांक ७, यार्ड क्रमांक एकमधील बॅरेक क्रमांक चारजवळ असलेल्या शौचालयात सोमनाथ गेला व स्वत:च्या पॅन्टच्या नाडीने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला़ मात्र, हा प्रकार कारागृह प्रशासनाच्या लक्षात आल्याने त्यांनी त्यास तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले़

दरम्यान, त्याने आत्महत्येचा प्रयत्न का केला, याबाबत माहिती मिळाली नाही़ या प्रकरणी मध्यवर्ती कारागृहातील भागवत निकम यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे़

Web Title:  nashik,central,jail,prisoner,attempt,suicide